Ads

अकोट–हीवरखेड रोडवर ‘कुटणखान्या’वर बुलडोझर!

By Nilesh Sir

August 10, 2026 2:37 pm

Ads

अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडाळी सटवाई ग्रामपंचायत परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा आरोप असलेल्या ‘कुटणखान्या’वर अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने बुलडोझर कारवाई केली. अकोट–हीवरखेड रोडवरील रेल्वे लाईनशेजारी, पेट्रोल पंपासमोर ही कारवाई करण्यात आली.

गेल्या अनेक दिवसांपासून हा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात होते.अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा. मात्र, इतके दिवस हा प्रकार सुरू असतानाही संबंधित यंत्रणांकडून कारवाई का करण्यात आली नाही, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने अखेर धडक कारवाई करत संबंधित ठिकाणी बुलडोझर फिरवला. कारवाईच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!
आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.

विशेष म्हणजे, बेकायदेशीर व्यवसाय इतके दिवस खुलेआम सुरू राहतोच कसा? त्याकडे ग्रामपंचायत, पोलीस आणि संबंधित प्रशासनाचे लक्ष गेले नव्हते का? कारवाई करण्यासाठी एवढा विलंब का झाला? या प्रश्नांची उत्तरे आता नागरिकांकडून मागितली जात आहेत.

कारवाई झाली, बुलडोझर धडकला; पण यापुढे हा प्रकार पुन्हा सुरू होणार नाही याची जबाबदारी कोण घेणार? हाच खरा सवाल आहे. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा! आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.प्रशासनाने केवळ कारवाईचा देखावा न करता या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवरही कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!