Ads

अकोट नगरपरिषदेचा अजब कारभार! आधी मुरूम, दोन दिवसांत काँक्रेट; एकाच खड्ड्यावर दोनदा निधी खर्चाचा सवाल

By Nilesh Sir

August 9, 2026 9:37 am

Ads

अकोट शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांबाबत ‘अकोला न्यूज नेटवर्क’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर नगर परिषद प्रशासनाला जाग आली. खड्डे बुजविण्याची कारवाई सुरू करण्यात आली; मात्र या कारवाईनेच आता नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

खड्ड्यांमध्ये आधी मुरूम टाकण्यात आला. मात्र हा मुरूम अवघ्या दोन दिवसांपुरताच राहिला आणि त्यानंतर त्याच खड्ड्यांमध्ये सिमेंट काँक्रेट करण्याचे काम सुरू करण्यात आले.अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.त्यामुळे नागरिकांमध्ये एकच सवाल उपस्थित होत आहे—जर त्या ठिकाणी सिमेंट काँक्रेटच करायचे होते, तर आधी मुरूम टाकण्याची घाई कशासाठी?

एकाच खड्ड्यावर दोन वेगवेगळ्या कामांचा खर्च?

एका बाजूला रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली मुरूम टाकण्यात आला आणि दुसऱ्याच बाजूला काही दिवसांत त्याच ठिकाणी काँक्रेटचे काम सुरू झाले. त्यामुळे मुरूम टाकण्याचा खर्च आणि त्यानंतर काँक्रेटचा खर्च अशा दोन वेगवेगळ्या बाबींवर सार्वजनिक निधी खर्च झाला का? असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

नगर परिषदेला रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करायचीच होती, तर त्याचे नियोजन आधीच का करण्यात आले नाही? मुरूम टाकण्यापूर्वी काँक्रेटचे काम प्रस्तावित होते का? कामाचे अंदाजपत्रक काय होते? मुरूम टाकण्याचा खर्च नेमका किती झाला? या सर्व प्रश्नांची उत्तरे नगर परिषद प्रशासनाने नागरिकांसमोर मांडण्याची गरज आहे.

दोन दिवसांची मलमपट्टी कशासाठी?

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मुरूम टाकणे ही तात्पुरती उपाययोजना असू शकते. मात्र अवघ्या दोन दिवसांत त्याच ठिकाणी काँक्रेटचे काम सुरू होत असेल, तर तात्पुरत्या दुरुस्तीवर खर्च करण्याची आवश्यकता काय होती? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.

‘अकोला न्यूज नेटवर्क’ने नागरिकांच्या समस्येला वाचा फोडल्यानंतर प्रशासनाने दुरुस्तीला सुरुवात केली, ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र दुरुस्तीच्या कामात निधीचा योग्य वापर आणि नियोजनाची पारदर्शकता तितकीच महत्त्वाची आहे.

जनतेच्या पैशाचा हिशोब कोण देणार?

नगर परिषद प्रशासनाने संबंधित रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर, अंदाजपत्रक, मुरूम टाकण्याचा खर्च, काँक्रेट कामाची किंमत आणि संबंधित ठेकेदाराची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली एकाच ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यांत खर्च झाला असेल, तर त्याचे कारण काय? नियोजनाचा अभाव असेल तर जबाबदार कोण? आणि जर दोन्ही कामे आवश्यक होती, तर त्यामागील तांत्रिक कारण काय?अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.

जनतेच्या करातून जमा होणारा पैसा हा कोणाच्याही मनमानी खर्चासाठी नसतो. त्यामुळे ‘खड्डे बुजविण्याच्या’ नावाखाली नेमका किती खर्च झाला आणि तो कशासाठी झाला, याचा हिशोब अकोट नगर परिषद प्रशासनाने जनतेसमोर मांडणे गरजेचे आहे.

नागरिकांचा थेट सवाल

एकाच खड्ड्यावर आधी मुरूम आणि नंतर काँक्रेट—ही दुरुस्तीची पद्धत की नियोजनाचा अभाव? आता अकोटकरांचे लक्ष नगर परिषद प्रशासनाच्या उत्तराकडे लागले आहे.

Related Article

वृक्षलागवडीचा पत्ता नाही, वृक्षतोडीला मात्र मोकळे रान! मोहाळा फाटा–आंबोळा मार्गावर प्रशासनाचा अजब कारभार?

अकोट नगरपरिषदेचा अजब कारभार! आधी मुरूम, दोन दिवसांत काँक्रेट; एकाच खड्ड्यावर दोनदा निधी खर्चाचा सवाल

कुटासातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर कुत्र्यांचा वावर; गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात, पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष?

अकोटमध्ये कावड उत्सवाची जय्यत तयारी; छावा शिवभक्त मंडळाच्या बैठकीत सचिन नागपुरे यांची अध्यक्षपदी निवड!

पोपटखेड धरणाचे गेट उघडले; अकोट तालुक्यातील २९ गावांना सतर्कतेचा इशारा!

चोहोट्टा बाजारात मटका बंद… मग एका ‘लाडक्या’ धंदेवाल्यालाच अभय कुणाचे?; पोलिसांच्या भूमिकेवर संशय

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!