Ads

कुटासातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर कुत्र्यांचा वावर; गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात, पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष?

By Nilesh Sir

August 9, 2026 6:11 am

Ads

अकोट तालुक्यातील कुटासा गावकऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या पाण्याच्या टाकीवर चक्क कुत्र्यांचा वावर होत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या स्वच्छतेचा आणि गावकऱ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

कुटासा गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर गावातील कुत्रे फिरत असल्याने या ठिकाणच्या स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच टाकीतून गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत असल्याने टाकीची स्वच्छता आणि सुरक्षितता राखणे अत्यंत गरजेचे आहे.

पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर कुत्र्यांचा वावर होत असतानाही पाणीपुरवठा विभाग तसेच गावातील पाणीपुरवठा विभागाचे संबंधित कर्मचारी याकडे लक्ष देत नसल्याचा सवाल उपस्थित होत आहे. पिण्याचे पाणी थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

पाणीपुरवठा विभागाने तातडीने लक्ष देऊन पाण्याच्या टाकीची स्वच्छता करावी, तसेच टाकीवर कुत्र्यांचा वावर होणार नाही यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

पिण्याच्या पाण्याच्या टाकीची अशी अवस्था कायम राहिल्यास गावकऱ्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभाग आता तरी जागा होणार का, असा सवाल गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!