Ads

जातीय अत्याचार प्रकरणात तिन्ही आरोपींचा जामीन फेटाळला; अकोला सत्र न्यायालयाचा आदेश, ॲड. नजीब शेख यांचा युक्तिवाद ठरला प्रभावी

By Nilesh Sir

July 30, 2026 5:50 pm

Ads

अकोला न्यूज नेटवाक | दिनांक 30 जुलै 2026 :- मागासवर्गीय सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि त्यांच्या पत्नीवर कथित जातीवाचक शिवीगाळ, मारहाण, जीवे मारण्याची धमकी तसेच घराची जाळपोळ केल्याच्या प्रकरणात अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील आरोपी दादा इंदुरीकर, गौरव इंदुरीकर आणि गौरव जामूनकर यांच्या जामीन अर्जाला न्यायालयाने नकार दिला आहे.

फौजदारी जामीन अर्ज क्रमांक 596/2026 वरील सुनावणीदरम्यान फिर्यादी पक्षाचे वकील ॲड. नजीब शेख यांनी आरोपींची कथित गुन्हेगारी पार्श्वभूमी, प्रकरणाचे गांभीर्य आणि जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव आणण्याची तसेच पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.

फिर्यादीनुसार, अकोला येथील राजरत्न कॉलनी, मलकापूर परिसरातील रहिवासी असलेल्या फिर्यादी आणि त्यांचे पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले पती यांना ३ जुलै २०२६ रोजी डॉक्टर कॉलनीतील त्यांच्या नव्या घराजवळ कथितरित्या मारहाण करण्यात आली. तसेच जातीवाचक शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी आणि घरातील साहित्याची जाळपोळ करून सुमारे १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. फिर्यादीने न्यायालयात आरोपींकडून अधिक पैशांची मागणी करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडविल्याचाही आरोप केला आहे.

अकोला शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांचा उल्लेखनीय तपास आणि सरकारी पक्षातर्फे ॲड. किरण खोत यांनी बाजू मांडली, तर फिर्यादीच्या वतीने ॲड. नजीब शेख, ॲड. शिबा मलिक आणि ॲड. सोहराबुद्दीन जागीरदार यांनी काम पाहिले.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!