Ads

ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोट ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

By Nilesh Sir

May 24, 2026 9:26 pm

Ads

गोवंशीय प्राण्यांची अवैध तस्करी रोखण्यासाठी सुरू असलेल्या “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत अकोट ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत एका आरोपीला रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत एक गोवंशीय प्राणी आणि मालवाहू टाटा एस वाहन असा एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक २४ मे २०२६ रोजी अकोट ग्रामीण पोलीस पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम टाटा एस वाहनातून गोवंशीय प्राण्याची अवैध वाहतूक करत अंजनगाव रोडमार्गे अकोटकडे येत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी दिवठाणा फाटा येथे पंचांसह नाकाबंदी केली.

दरम्यान, अंजनगाव रोडवरून येणारे टाटा एस वाहन थांबवून पोलिसांनी तपासणी केली असता वाहनामध्ये भुरकट-कथई रंगाचा गो-हा निर्दयतेने नॉयलॉन दोरीने बांधलेला आढळून आला. वाहन चालकाकडे संबंधित गोवंश वाहतुकीची वैध कागदपत्रे आणि पावती मागितली असता त्याच्याकडे कोणतीही परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी आरोपी आदीन बेग जावेद बेग, वय २१ वर्ष, रा. पणज ता. अकोट याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचा गोवंशीय प्राणी आणि एमएच ३० ओबी १०६२ क्रमांकाचे २ लाख रुपये किमतीचे टाटा एस वाहन असा एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. ४४९/२०२६ नुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५ (अ), ९ तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविणे अधिनियम १९६० च्या कलम ११ (१) (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. चंद्रकांत रेड्डी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे, पोउपनि प्रशांत उज्जैनकर, पोउपनि वैभव तायडे, पोहेकॉ विठ्ठल चव्हाण, पोहेकॉ नितीन तेलगोटे आणि पोकॉ गोपाल जाधव यांनी ही कारवाई यशस्वी केली.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!