Ads

बुलढाण्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांची मोठी धाड; ८ जण ताब्यात,

By Nilesh Sir

May 20, 2026 9:15 am

Ads

बुलढाणा शहरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला असून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, वाहने आणि इतर साहित्य असा एकूण ५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात ‘मिशन परिवर्तन’ मोहिम राबवण्यात येत असून अमली पदार्थ, अवैध दारू, गांजा आणि जुगार यांसारख्या अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुलढाणा शहरातील सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापेमारी केली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून आठ जणांना ताब्यात घेत विविध कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच आरोपींकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बुलढाणा शहरात अजूनही अवैध दारू, गांजा आणि जुगाराचे प्रकार सुरू असल्याचे समोर येत असून आता स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलीस दोन्हीही ॲक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत सुरू असलेल्या या कारवायांमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पुढील काळातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Article

प्रेमाचा करुण अंत! विहिरीत उडी घेतलेल्या प्रियकराचा मृत्यू; तरुणीनेही केले विषप्राशन

सातपुड्याच्या हिरवाईला दारूच्या बाटल्यांचा डाग!पावसाळी पर्यटनाच्या नावाखाली मद्यपानाचा धुमाकूळ?

सातपुड्याच्या ‘एंट्री गेट’वरच CCTV बंद! पोपटखेड तपासणी नाका वनविभागाच्या भरवशावर; सुरक्षेवर गंभीर सवाल

रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पाच वर्षांनी हरवलेल्या महिलेची कुटुंबीयांशी पुनर्भेट; आधार ठरला शोधाचा महत्त्वाचा दुवा

हिवरखेडमध्ये महायुतीचा ‘महासंग्राम’! भाजप-शिंदेसेना आमनेसामने; नगरपालिकेत जोरदार राडा

दानापूरमध्ये ईद-ए-मिलादचा जल्लोष! आकर्षक देखाव्यांसह भव्य मिरवणूक; सामाजिक सलोखा अन् बंधुभावाचे दर्शन

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!