Ads

खामगाव हादरलं! पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडचे सपासप वार; पतीनेच केली निर्घृण हत्या

By Nilesh Sir

May 15, 2026 1:36 pm

Ads

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात घरगुती वादातून एका २२ वर्षीय विवाहितेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे गेट परिसरातील झोपडपट्टी भागात पतीने पत्नीच्या डोक्यावर लोखंडी सब्बलने वार करत तिची हत्या केली. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश रूपलाल सोळंके (वय २५) आणि त्याची पत्नी सविता प्रकाश सोळंके (वय २२) यांच्यात गुरुवारी रात्री उशिरा जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात प्रकाशने घरातील लोखंडी सब्बल उचलून सविताच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात सविताचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. फिर्यादी संजय शेनाजी मेढे यांनी घटनास्थळी धाव घेतली असता सविता रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेली होती, तर आरोपी हातात रक्ताने माखलेली सब्बल घेऊन उभा होता. “मीच सविताला मारलं आहे, आता पोलीस स्टेशनला जातो,” अशी कबुली देत आरोपी घटनास्थळावरून निघून गेला असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणी आरोपी प्रकाश सोळंके विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास पाटील करत आहेत. अवघ्या २२ वर्षांच्या विवाहितेचा अशा क्रूर पद्धतीने झालेला मृत्यू पाहून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!