Ads

पोलिस चौकीसमोरच ६५ वर्षीय इसमाचे विषप्राशन; वाडेगावात खळबळ

By Nilesh Sir

May 13, 2026 9:15 pm

Ads

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक पोलिस चौकीसमोरच एका ६५ वर्षीय इसमाने विष प्राशन केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना बुधवार, १३ मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पातूर तालुक्यातील आगीखेड येथील रहिवासी देवगन राघोजी अवचार (वय ६५) यांनी वाडेगाव पोलिस चौकीसमोर विष प्राशन केले. विशेष म्हणजे घटना घडली त्या वेळी पोलिस चौकीमध्ये कोणतेही कर्मचारी उपस्थित नसल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित इसमासोबत त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. त्यांनी हा प्रकार लक्षात येताच तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत करवते यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, अकोला येथे हलविण्यात आले.

दरम्यान, ही घटना घरगुती वादातून घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेमुळे वाडेगाव परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.


Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!