Ads

व्याजाच्या पैशासाठी नराधमाचा हैवानपणा! अश्लील व्हिडिओ बनवून सावकाराचा हैवानपणा उघड!

By Nilesh Sir

April 24, 2026 8:19 am

Ads

कोल्हापूरमध्ये खाजगी सावकारीच्या नावाखाली महिलांवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. परतवाडा येथील भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर राज्य हादरले असतानाच आता कोल्हापूरमधील आणखी एका धक्कादायक प्रकरणाने जनतेचा संताप अनावर झाला आहे.

कोल्हापूरच्या गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका पीडित महिलेने सावकार अमित सावंत याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पैशांच्या वसुलीसाठी जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप करत संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर गांधीनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अमित सावंत याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला आर्थिक अडचणीमुळे दोन वर्षांपूर्वी अमित सावंत याच्याकडून दोन लाख रुपये दहा टक्के व्याजाने घ्यावे लागले होते. सुरुवातीला काही महिने व्याजाची रक्कम भरल्यानंतर आर्थिक परिस्थिती खालावल्याने महिलेला पैसे देणे शक्य झाले नाही. याचाच गैरफायदा घेत सावकार अमित सावंत हा महिलेच्या घरी पोहोचला आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या घटनेचा व्हिडिओ शूट करून त्याच व्हिडिओच्या आधारे महिलेला धमकावत पुन्हा पुन्हा अत्याचार करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे. एवढेच नव्हे तर संबंधित अश्लील व्हिडिओ त्याने आपल्या मित्रांना देखील दाखवले, असा गंभीर आरोप समोर आला आहे.

पीडित महिलेने आणखी धक्कादायक दावा करत अमित सावंतच्या मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडिओ असल्याचे सांगितले आहे. आर्थिक विवंचनेत असलेल्या अनेक महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणात अमित सावंतचा मित्र रोहित कदम आणि सावंतची पत्नी यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

या सर्व प्रकारामुळे कोल्हापूरमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आणखी काही महिला तक्रारीसाठी पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून येत्या काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!