Ads

अकोट ग्रामीण पोलिसांची गुटखा विक्रीवर धडक कारवाई! 23 हजारांचा प्रतिबंधित माल जप्त

By Nilesh Sir

April 18, 2026 10:33 pm

Ads

अकोट तालुक्यातील रुईखेड येथे पोलीसांनी मोठी कारवाई करत प्रतिबंधित पान मसाला व गुटखा जप्त केला आहे. दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमेश श्रीकृष्ण गायगोले हा आपल्या “सदगुरु कृपा किराणा” दुकानात शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची विक्री करत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पंचासमक्ष दुकानाची झडती घेण्यात आली असता विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आले.

या कारवाईत बाजीराव गोल्ड, नजर पान मसाला तसेच इतर ब्रँडचे एकूण २३,९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोउपनि वैभव तायडे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा विक्रीविरोधात पोलीस प्रशासनाची कारवाई सुरूच असून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Related Article

प्रेमाचा करुण अंत! विहिरीत उडी घेतलेल्या प्रियकराचा मृत्यू; तरुणीनेही केले विषप्राशन

सातपुड्याच्या हिरवाईला दारूच्या बाटल्यांचा डाग!पावसाळी पर्यटनाच्या नावाखाली मद्यपानाचा धुमाकूळ?

सातपुड्याच्या ‘एंट्री गेट’वरच CCTV बंद! पोपटखेड तपासणी नाका वनविभागाच्या भरवशावर; सुरक्षेवर गंभीर सवाल

रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पाच वर्षांनी हरवलेल्या महिलेची कुटुंबीयांशी पुनर्भेट; आधार ठरला शोधाचा महत्त्वाचा दुवा

हिवरखेडमध्ये महायुतीचा ‘महासंग्राम’! भाजप-शिंदेसेना आमनेसामने; नगरपालिकेत जोरदार राडा

दानापूरमध्ये ईद-ए-मिलादचा जल्लोष! आकर्षक देखाव्यांसह भव्य मिरवणूक; सामाजिक सलोखा अन् बंधुभावाचे दर्शन

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!