Ads

मायेनं दिलं जन्म… पण तिनेच घेतला जीव?

By Nilesh Sir

April 7, 2026 11:32 am

Ads

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. देवाचं दुसरं रूप मानल्या जाणाऱ्या आईनेच आपल्या अवघ्या ११ महिन्यांच्या बाळाची निर्दयीपणे हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे समाजात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा रवींद्र पवार या महिलेने तिच्या मुलगा कु. यश रविंद्र पवार याची हत्या केली. आरोपी महिला काही दिवसांपूर्वी कोकणातील मुरुड येथे जाऊन आली होती. मात्र तिचा मुलगा सतत रडत असल्याने ती त्रस्त झाली होती. याच दरम्यान तिने दुसरे लग्न करण्याचा विचार केला.

तथापि, लहान मुलासह कोणीही आपल्याशी लग्न करणार नाही, या भीतीतून तिने थरकाप उडवणारा निर्णय घेतला. आपल्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी तिने स्वतःच्या मुलालाच संपवण्याचा कट रचला.

यानंतर तिने ११ महिन्यांच्या निष्पाप बाळाचे डोके सिमेंटच्या ओट्यावर आपटून त्याची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. एवढ्यावरच न थांबता, गुन्हा लपवण्यासाठी तिने मुलाचा मृतदेह बॅगेत भरून शेतातील विहिरीत फेकून दिला.

या प्रकरणी मयत मुलाचे वडील रवींद्र अशोक पवार यांनी रांजणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी आईला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

माणुसकीला काळीमा

या अमानुष घटनेमुळे “आई” या नात्यालाच काळिमा फासला गेला आहे. एका जन्मदात्या आईनेच एवढा क्रूर निर्णय घेणे हे समाजासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय

राज्यात वाढत चाललेल्या अशा भयानक गुन्ह्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मानसिक आरोग्य, सामाजिक परिस्थिती आणि कुटुंबातील तणाव यावरही गंभीर चर्चा होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!