Ads

ताडोबात नियमभंग महागात! आमदारांनाही नाही सूट; मोबाईल वापरल्याप्रकरणी ५ हजारांचा दंड

By Nilesh Sir

April 6, 2026 1:23 pm

Ads

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीदरम्यान मोबाईल वापरण्यावर बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वरोरा मतदारसंघाचे भाजप आमदार करण देवतळे यांच्यावर ताडोबा प्रशासनाने कारवाई केली आहे. या प्रकरणात त्यांच्याकडून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याने “नियम सर्वांसाठी समान” असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा देशातील महत्त्वाच्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असून येथे वन्यजीवांचे संरक्षण आणि पर्यटनातील शिस्त राखण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. सफारीदरम्यान मोबाईल फोन वापरणे किंवा जवळ बाळगणे यावर सक्त मनाई करण्यात आली आहे.

सदर प्रकरणात आमदार करण देवतळे यांनी सफारीदरम्यान मोबाईलचा वापर केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वांचे लक्ष ताडोबा प्रशासनाच्या कारवाईकडे लागले होते. सामान्य पर्यटकांवर तत्काळ कारवाई केली जाते, मग आमदारांवरही समान नियम लागू होतील का, असा सवाल उपस्थित केला जात होता.

या पार्श्वभूमीवर ताडोबा-अंधारी टायगर रिझर्व कंझर्वेशन फाउंडेशन, चंद्रपूर यांनी या प्रकरणाची दखल घेत आमदारांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, यासाठी पावती क्रमांक 190272 देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या कारवाईमुळे ताडोबा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, वन्यजीव संरक्षण आणि नियमांचे पालन याबाबत कोणालाही सूट दिली जाणार नाही. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या नियमभंगावर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!