Ads

प्रेम की ब्लॅकमेल? धमक्या, फोटो आणि आणि संपली एक निष्पाप जीवनकहाणी!

By Nilesh Sir

April 6, 2026 11:36 am

Ads

जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका २१ वर्षीय युवतीला लग्नासाठी जबरदस्ती करत, “लग्न कर नाहीतर आपले फोटो तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवीन” अशी वारंवार धमकी देण्यात येत होती. या मानसिक त्रासाला कंटाळून संबंधित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीच्या सततच्या धमक्या आणि दबावामुळे मृत तरुणीचे लग्नही मोडले होते. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. अखेर वैफल्यग्रस्त अवस्थेत तिने आपली जीवनयात्रा संपवल्याची तक्रार ४ एप्रिल रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गौरव पुरुषोत्तम खंडारे (वय २२, रा. पळशी सुपो) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे करत आहेत.

ही घटना समाजाला हादरवून टाकणारी असून, सोशल मीडियाचा गैरवापर आणि मानसिक छळ किती घातक ठरू शकतो याचे गंभीर उदाहरण ठरत आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!