Ads

RTE लॉटरी आज! हजारो पालकांची धडधड वाढली, २ हजार जागांसाठी तिप्पट स्पर्धा

By Nilesh Sir

April 6, 2026 10:13 am

Ads

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठीची ऑनलाईन लॉटरी आज सकाळी ११ वाजता काढली जाणार असून हजारो पालकांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेल्या पालकांचे लक्ष आता या लॉटरी निकालाकडे लागले आहे.

यंदा जिल्ह्यात RTE प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून एकूण ५,५९८ अर्ज दाखल झाले आहेत. मात्र उपलब्ध जागा केवळ २,०५६ असल्यामुळे प्रवेशासाठी जवळपास तिपटीने स्पर्धा निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील १८५ खासगी शाळांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे.

विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या आणि नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले असल्याने लॉटरी प्रक्रियेबाबत उत्सुकता आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांची निवड पूर्णपणे संगणकीय आणि पारदर्शक पद्धतीने केली जाणार आहे. कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपाला वाव नसून डिजिटल प्रणालीद्वारे ही प्रक्रिया पार पडणार आहे.

लॉटरीनंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी अधिकृत RTE पोर्टलवर जाहीर केली जाईल. तसेच पालकांना एसएमएसद्वारे माहिती मिळणार असून पोर्टलवर लॉगिन करून अर्जाची स्थिती तपासण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

निवड झाल्यानंतर पालकांनी वेळेत पुढील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून गटशिक्षणाधिकारी कार्यालयात कागदपत्र पडताळणी करावी लागेल आणि त्यानंतर संबंधित शाळेत प्रवेश निश्चित करावा लागेल.

RTE लॉटरीमुळे हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा मार्ग निश्चित होणार असून, आजचा दिवस पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Related Article

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान; अकोल्यात १३ केंद्रांवर तयारी पूर्ण

राजू शर्माची दादागिरी सात लाखांच्या कर्जापोटी शेतजमीन हडपल्याचा आरोप; शेतातील कापूसही नेल्याची तक्रार,

Diwali Vacation 2026: महाराष्ट्रातील शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर; २ नोव्हेंबरपासून सुट्ट्यांना सुरुवात

अल्पवयीन मुलीशी संबंधित विनयभंग प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर ॲड. कैलास व्ही. अनमाने यांचा सटिक युक्तिवाद

प्रत्येक नागरिक पत्रकार होऊ शकतो का? पत्रकारांच्या ओळखीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!