Ads

अकोल्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड! विदेशी महिलेच्या सहभागाने खळबळ

By Nilesh Sir

April 4, 2026 2:15 am

Ads

अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या देह व्यापारावर स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने मोठी संयुक्त कारवाई करत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत विदेशी महिलेचा सहभाग उघड झाल्याने संपूर्ण प्रकरणाला गंभीर वळण मिळाले असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.

गौरक्षण रोड परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये गुप्त माहितीच्या आधारे पोलीसांनी छापा टाकला. अनेक दिवसांपासून येथे बेकायदेशीर देह व्यापार सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळत होती. योग्य वेळी नियोजनबद्ध कारवाई करत पोलीसांनी एका विदेशी महिलेसह स्थानिक महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले.

या प्रकरणात अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे विदेशी महिला अकोल्यात कशी पोहोचली? तिच्यामागे कोणते जाळे कार्यरत आहे? यामुळे मानवी तस्करीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय अधिक गडद झाला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, “सोनू” नावाच्या संशयित व्यक्तीच्या माध्यमातून विदेशी महिलांना शहरात आणले जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणामागील संपूर्ण साखळी उलगडणे हे पोलीसांसमोर मोठे आव्हान आहे.

कारवाईनंतर काही तथाकथित प्रतिष्ठित आणि राजकीय संबंधित व्यक्तींची पोलीस ठाण्यातील हालचाल वाढल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या रॅकेटला प्रभावशाली लोकांचा पाठिंबा आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, पूर्व आफ्रिकेतील टांझानिया देशातील महिला अकोल्यात या व्यवसायात सहभागी असल्याचे उघड झाल्याने हा प्रकार केवळ स्थानिक नसून आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानवी तस्करीशी संबंधित असण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

या पार्श्वभूमीवर, अकोला पोलीस प्रशासनाने केवळ पिटा कायद्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता मानवी तस्करी, आर्थिक व्यवहार, आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि संपूर्ण रॅकेटचा सखोल तपास करण्याची गरज व्यक्त होत आहे. राज्य आणि केंद्र स्तरावरील यंत्रणांनीही या प्रकरणाची दखल घेणे आवश्यक मानले जात आहे.

दरम्यान, या कारवाईनंतर पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता असून, अकोल्यातील बेकायदेशीर व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!