Ads

---

गॅस हेल्पलाईन नंबर दिला… पण बंदच! तक्रार करायची तरी कुठे? प्रशासनाचा कारभार पुन्हा संशयात

By Nilesh Sir

April 3, 2026 1:21 pm

Ads

जिल्ह्यातील घरगुती एलपीजी गॅस संदर्भातील तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालय, अकोला येथे “तक्रार निवारण कक्ष” स्थापन करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. यासाठी ८०१०१५३७८० हा व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांकही जाहीर करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात हा क्रमांक बंद असल्याचे उघड झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागरिकांना गॅस वितरणातील अडचणी, उशिरा मिळणारी डिलिव्हरी, अतिरिक्त पैशांची मागणी यांसारख्या तक्रारी सहजपणे नोंदवता याव्यात, या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली होती. परंतु हेल्पलाईनच बंद असल्याने नागरिकांनी तक्रार करायची तरी कुठे? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

प्रशासनाकडून मोठ्या धडाक्यात घोषणा केल्या जातात, पण अंमलबजावणीत मात्र पूर्णपणे ढिसाळपणा दिसून येतो. “नंबर दिला तर तो चालू ठेवण्याची जबाबदारी कोणाची?” हा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जात आहे.

या प्रकारामुळे गॅस ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, तक्रारी नोंदवण्याचा मार्गच बंद झाल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, वेळ वाचवण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी सुरू केलेली सुविधा उलट नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

प्रशासन फक्त घोषणा करण्यात व्यस्त की प्रत्यक्ष कामातही गंभीर आहे? असा थेट सवाल आता समोर येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ याची दखल घेत हेल्पलाईन सुरू करावी, अन्यथा नागरिकांचा संताप आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!