Ads

अकोल्यात अवैध रेती माफियांचा धुमाकूळ; एक ट्रॅक्टर जप्त, पण प्रशासन अजूनही झोपेत?

By Nilesh Sir

March 13, 2026 5:04 pm

Ads

अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यात अवैध रेती उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भटोरी नाक्यावर मंडळ अधिकारी अनिल वासुदेवराव ओइंबे यांच्या फिर्यादीवरून लाखपुरी येथील संदीप साहेबराव इंगळे या ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लाखपुरी येथील रेती घाटावरून विनापरवाना रेती वाहतूक करताना आरोपीला पकडण्यात आले. पोलिसांनी एमएच-30 एबी-5154 क्रमांकाचा महिंद्रा ट्रॅक्टर, विनानंबर पिवळी ट्रॉली आणि सुमारे 1 ब्रास रेती असा एकूण सुमारे 1 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मात्र या कारवाईनंतर प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मुर्तीजापूर तालुक्यात अनेक ठिकाणी सर्रासपणे अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. रात्रीच्या अंधारात घाटांवरून रेतीचे ट्रॅक्टर खुलेआम फिरत असल्याचे नागरिक सांगत आहेत. अशा वेळी प्रशासनाला हे दिसत नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.

दरवेळी एखादा ट्रॅक्टर पकडून कारवाई दाखवली जाते; मात्र मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या रेती माफियांच्या जाळ्यावर कठोर कारवाई का होत नाही, याबाबत नागरिकांमध्ये संताप आहे. काही ठिकाणी या अवैध धंद्याला राजकीय आशीर्वाद असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे.

पर्यावरणाचे मोठे नुकसान करून नदीपात्रांची वाट लावणाऱ्या या रेती माफियांवर कठोर कारवाई करण्याची गरज असताना प्रशासन मात्र कागदोपत्री कारवायांपुरते मर्यादित असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे “अवैध रेती उत्खनन थांबवणार कोण?” असा सवाल आता जनतेतून जोर धरू लागला आहे.

प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असला तरी, मुर्तीजापूर तालुक्यात सुरू असलेल्या या अवैध रेती उत्खननावर प्रशासन खरोखरच अंकुश ठेवणार का, की फक्त दिखाऊ कारवायाच सुरू राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Article

Supreme Court: वाहतूक नियम मोडलात तर थेट वीज बिलातच येणार दंडाची रक्कम; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

आदर्श गोरक्षण संस्थेतून १२ वर्षीय मुलगी बेपत्ता; लोणारमध्ये सुरक्षित सापडली

अकोला सत्र न्यायालयाकडून व्यावसायिक इरशाद खान यांना अटकपूर्व जामीन; कॉपीराइट प्रकरणात अँडव्होकेट शिवम शर्मा यांचा युक्तिवाद महत्त्वाचा

ट्रकच्या संपूर्ण नुकसानीप्रकरणी विमा कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका; २५.७९ लाख रुपये ६ टक्के व्याजासह देण्याचा आदेश

बेडरूममध्ये छुपा कॅमेरा बसवून महिलेचे खासगी व्हिडीओ केल्याचा आरोप; कारपेंटरचा जामीन अर्ज फेटाळला

उमरा फाट्याजवळ काळाचा घाला! ट्रॅक्टर ट्रॉली पलटी; एका मजुराचा मृत्यू, ५ गंभीर जखमी

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!