Ads

---

पोपटखेड–अकोट मार्गावर भीषण अपघात; टिप्परची मोटारसायकलला मागून धडक, उमरा येथील युवक गंभीर जखमी

By Nilesh Sir

March 11, 2026 8:39 pm

Ads

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो गणेश बुटे दिनाक ११ मार्च

अकोट तालुक्यातील पोपटखेड–अकोट मार्गावर अवजड वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दहीखेड फाट्याजवळ टिप्परने मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिल्याने उमरा येथील ३५ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवजड वाहनांवर नियंत्रणाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभूदास आवंडकर (वय ३५, रा. उमरा) हे आपल्या आईला गजानन महाराज विहीर येथे सेवाधारी म्हणून सोडून मोटारसायकलने घरी परतत होते. दरम्यान, पोपटखेड–अकोट मार्गावरील दहीखेड फाट्याजवळ एका वेगात येणाऱ्या टिप्परने त्यांच्या मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की मोटारसायकलस्वार प्रभूदास आवंडकर गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर टिप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. एकलव्य आपत्कालीन पथकाचे पांडुरंग तायडे यांच्या मदतीने जखमी प्रभूदास आवंडकर यांना तातडीने अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वैद्यकीय तपासणीत त्यांच्या पायाला गंभीर फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, पोपटखेड–अकोट मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहने धावत असल्याने या रस्त्यावर वारंवार अपघात घडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) तसेच महसूल प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

यासोबतच अपघात करून पळून गेलेल्या टिप्पर चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एकलव्य आपत्कालीन पथकाचे पांडुरंग तायडे यांनी केली आहे.

या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने रस्ते सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Related Article

एकतर्फी प्रेमाचा विकृत सूड? निष्पाप चिमुकल्याची निर्घृण हत्या;

जिवंतपणी कुणी नव्हतं सोबत… मृत्यूनंतर मिळाला माणुसकीचा खांदा! अकोटमध्ये अनोळखी मृतदेहांना सन्मानाने निरोप देणारे पांडुरंग तायडे

जीवाशी खेळ? प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात आढळला डॉक्टरांचा ग्लोव्ह

चिचखेड फाट्यावर भीषण अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत चारचाकीचा चुराडा, चालक गंभीर जखमी

जन्माआधीच मृत्यूची नोंद!प्रसूती वेदनांपासून मृत्यूच्या वेदनेपर्यंत; एका आईची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

LCB अडचणीत; बुलढाण्यात पोलिसांचा मोठा घोळ? जिच्या हत्येप्रकरणी वडील-भाऊ जेलमध्ये, तीच तरुणी निघाली जिवंत, LCB च्या तपासावर गंभीर प्रश्न

No comments to show.

Leave a Comment