Ads

--

गोंदिया धक्कादायक! डूग्गीपार पोलीस स्टेशन पार्किंगमध्ये तेलंगणातील रुग्णवाहिका चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

By Nilesh Sir

February 17, 2026 8:32 am

Ads

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून डूग्गीपार पोलीस स्टेशनच्या पार्किंग परिसरात तेलंगणा राज्यातील रुग्णवाहिका चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शिवा असे मृत चालकाचे नाव असून तो तेलंगणा राज्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


मृतदेह घेऊन जात असताना घडली वादाची घटना

मिळालेल्या माहितीनुसार, शिवा हा खाजगी रुग्णवाहिकेतून तेलंगणातून एक मृतदेह घेऊन नातेवाईकांसह त्यांच्या गावी जात होता. प्रवासादरम्यान गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात आल्यानंतर चालकाने मद्यप्राशन केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. यावरून चालक व मृताच्या नातेवाईकांमध्ये जोरदार वाद झाला.

वाद वाढत गेल्याने संबंधित नातेवाईकांनी डूग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत मृतदेह दुसऱ्या रुग्णवाहिकेत ठेवून पुढील प्रवासासाठी रवाना केला. तर मूळ रुग्णवाहिका व चालक शिवा यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले.


पार्किंगमध्ये उभ्या वाहनाला गळफास

दरम्यान आज सकाळी पोलीस स्टेशनच्या पार्किंग परिसरात उभ्या असलेल्या एका पिकअप वाहनाच्या मागील बाजूस दोरीच्या साहाय्याने शिवाने गळफास घेतल्याचे आढळून आले. माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.


तणावातून टोकाचे पाऊल की अन्य कारण?

पोलिसांनी वाहन अडविल्यामुळे व झालेल्या कारवाईच्या तणावातून शिवाने आत्महत्या केली की यामागे अन्य काही कारण आहे, याचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास गोंदिया पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सर्व बाबींची बारकाईने चौकशी केली जात आहे.


परिसरात खळबळ; कुटुंबीयांना माहिती

या घटनेमुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृताच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली असून तपासाअंती आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.


Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!