Ads

--

दहिहांडा पोलिसांची सिने स्टाईल कारवाई | पाठलाग करून गोवंश तस्करीचा डाव उधळला; इंडीगो कार जप्त

By Nilesh Sir

February 16, 2026 10:19 pm

Ads

अकोट तालुक्यातील दहिहांडा पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश तस्करीविरोधात धडक कारवाई करण्यात आली असून सिने स्टाईल पाठलाग करून पोलिसांनी चारचाकी वाहन जप्त केले आहे. या कारवाईमुळे गोवंश तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री दरम्यान दहिहांडा पोलीस स्टेशनचे नाईट ऑफिसर व पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करत होते. दरम्यान ग्राम कावसा येथील बौद्ध विहाराजवळ रात्री सुमारे १.३० वाजता एक संशयित चारचाकी वाहन येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पळ काढला.

यानंतर पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू केला. कावसा येथून शेगाव रोडकडे धावणाऱ्या या वाहनाचा थरारक पाठलाग करत अखेर साईकृपा पेट्रोलपंपजवळ वाहन अडवण्यात आले. मात्र वाहनातील तीनही आरोपी अंधाराचा फायदा घेत खाली उतरून पळून गेले. पोलिसांनी शोधमोहीम राबवली, मात्र ते हाती लागले नाहीत.

वाहनाची तपासणी केली असता इंडीगो कार क्रमांक MH-12 KN-0626 (अंदाजे किंमत २ लाख रुपये) आढळून आली. वाहनात एक लाल रंगाची, सुमारे १५ वर्षे वयाची गाय आढळली. शिंगे आतील बाजूस वळलेली व शेपटीचा गोंडा काळा असा तपशील नोंदवण्यात आला. गायीची किंमत अंदाजे १५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान एक गोवंश वाहनातून खाली उतरून अंधारात निसटल्याचेही समोर आले.

स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जनावरांची निर्दयतेने कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी दहिहांडा पोलीस स्टेशन येथे प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील (उपविभाग अकोट) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले (ठाणेदार), पो.उपनि. प्रकाश महाजन, पो.हवा. सतीश वानखडे, विजय चव्हाण व विनोद गोलाईत यांच्या पथकाने केली.

पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!