Ads

---

उपचाराच्या नावाखाली नवजात बालिकेची विक्री; बाळविक्री रॅकेटचा पर्दाफाश

By Nilesh Sir

February 12, 2026 8:51 am

Ads

स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने दहा दिवसांच्या बालिकेला उपचारासाठी नागपूरला पाठवतो, असे सांगून तिची अडीच लाख रुपयांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गोंदिया येथील डॉ. नीतेश बाजपेयी असून तो सध्या फरार आहे. वरठी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

मोहाडी तालुक्यातील पांढराबोडी येथील मालती प्रकाश वाघमारे हिच्या घरी दहा दिवसांची नवजात बालिका असल्याची माहिती २ फेब्रुवारी रोजी महिला व बालकल्याण विभागाच्या ‘चाइल्ड हेल्पलाईन’वर अज्ञात व्यक्तीने दिली होती. त्यानुसार हेल्पलाईन समन्वयक घटनास्थळी पोहोचले असता बालिका आढळून आली. चौकशीदरम्यान ती गोंदिया येथून आणल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर तपासाला वेग आला. दरम्यान, ४ फेब्रुवारी रोजी बालिकेचे खरे आई-वडील बालकल्याण समितीसमोर हजर झाले आणि संपूर्ण प्रकार उघड झाला. पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुदतपूर्व जन्म झालेल्या बालिकेची प्रकृती नाजूक होती. उपचारासाठी तिला डॉ. नीतेश बाजपेयी यांच्याकडे दाखल करण्यात आले होते.

उपचारासाठी पैसे नसल्याने बालिकेला स्वयंसेवी संस्थेमार्फत नागपूर येथे पाठवतो, असे सांगत डॉक्टरांनी पालकांची दिशाभूल केली. प्रत्यक्षात ललेश्वरी सादेपाच (रा. गोंदिया) हिच्या मदतीने बालिकेची मालती वाघमारे यांना अडीच लाख रुपयांत विक्री करण्यात आल्याचे तपासात समोर आले.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून मुख्य आरोपी फरार असल्याने त्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!