Ads

---

रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबाराचा थरार! अकोला कनेक्शन उघड, लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित शुभम लोणकरने घेतली जबाबदारी

By Nilesh Sir

February 3, 2026 10:49 am

Ads

मुंबईतील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने देशभरात खळबळ उडवली आहे. या गंभीर घटनेनंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या धमकीच्या पोस्टमुळे प्रकरणाला आणखी धक्कादायक वळण मिळाले आहे. या पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित शुभम लोणकर याने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्होरी गावचा रहिवासी असल्याने जिल्ह्यातही मोठी खळबळ उडाली आहे.

गोळीबारानंतर काही वेळातच सोशल मीडियावर धमकीची पोस्ट व्हायरल झाली. या पोस्टमध्ये “हा फक्त ट्रेलर आहे, इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास पुढील वेळी थेट बेडरूममध्ये गोळ्या झाडल्या जातील,” अशी थेट धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शुभम लोणकरचे नाव याआधीही अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारणाऱ्यांमध्येही त्याचे नाव पुढे आले होते. याशिवाय, बंदूक तस्करी प्रकरणात अकोला पोलिसांनी त्याच्याकडून तीन पिस्टल आणि जिवंत काडतुसे जप्त केली होती. त्याचा थेट संपर्क लॉरेन्स आणि अनमोल बिश्नोई यांच्याशी असल्याचे कॉल रेकॉर्डमधून स्पष्ट झाले होते.

दरम्यान, नेव्होरी गावातील त्याचे घर अनेक दिवसांपासून बंद असून गावात तणावपूर्ण वातावरण आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांसह विविध यंत्रणांकडून वेगाने सुरू असून, संपूर्ण नेटवर्क उघड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Related Article

एकतर्फी प्रेमाचा विकृत सूड? निष्पाप चिमुकल्याची निर्घृण हत्या;

जिवंतपणी कुणी नव्हतं सोबत… मृत्यूनंतर मिळाला माणुसकीचा खांदा! अकोटमध्ये अनोळखी मृतदेहांना सन्मानाने निरोप देणारे पांडुरंग तायडे

जीवाशी खेळ? प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात आढळला डॉक्टरांचा ग्लोव्ह

चिचखेड फाट्यावर भीषण अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत चारचाकीचा चुराडा, चालक गंभीर जखमी

जन्माआधीच मृत्यूची नोंद!प्रसूती वेदनांपासून मृत्यूच्या वेदनेपर्यंत; एका आईची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

LCB अडचणीत; बुलढाण्यात पोलिसांचा मोठा घोळ? जिच्या हत्येप्रकरणी वडील-भाऊ जेलमध्ये, तीच तरुणी निघाली जिवंत, LCB च्या तपासावर गंभीर प्रश्न

No comments to show.

Leave a Comment