Ads

--

नरनाळा महोत्सव स्थगित! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील कार्यक्रम पुढे ढकलले

By Nilesh Sir

January 28, 2026 12:11 pm

Ads

राज्यावर शोककळा पसरवणाऱ्या दुःखद घटनेनंतर अकोला जिल्ह्यात नियोजित असलेला नरनाळा महोत्सव पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेला नरनाळा महोत्सव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला आहे. या निर्णयाची अधिकृत माहिती जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिली आहे.

शोकसंतप्त वातावरण लक्षात घेता, प्रशासनाने नरनाळा महोत्सवाशी संबंधित सर्व कार्यक्रम तात्पुरते पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून, पुढील तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

नरनाळा किल्ला परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या महोत्सवासाठी पर्यटक, कलाकार आणि स्थानिक नागरिक उत्सुकतेने वाट पाहत होते. मात्र राज्यातील शोकांतिकेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याने नागरिकांकडूनही समजूतदार प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, नवीन कार्यक्रमाचे वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!