Ads

--

गणित चुकलं म्हणून चौथीच्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण; बुलढाण्यात शिक्षकाची क्रूरता उघड

By Nilesh Sir

January 24, 2026 11:35 am

Ads

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकानेच क्रूरतेची सीमा ओलांडत केवळ गणिताचे उत्तर चुकल्याच्या कारणावरून चौथीतील विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

१३ डिसेंबर रोजी राज्य शासनाने शाळांमधील विद्यार्थी सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले असतानाही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळगाव राजा येथे चौथीत शिकणाऱ्या पवन इंगळे (वय ९ वर्षे) या विद्यार्थ्याला वर्गातील गणित न सुटल्याने शिक्षक रवींद्र यांनी बेदम मारहाण केली.

मारहाण इतकी गंभीर होती की पवनला तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्याची वैद्यकीय तपासणी करून उपचार सुरू केले आहेत. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, या प्रकरणात अद्यापही शिक्षकावर ठोस कारवाई न झाल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाचे आदेश असतानाही अशा घटना घडत असल्याने शिक्षण विभागाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. आता पोलिस व शिक्षण विभाग या शिक्षकावर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!