Ads

---

Akola Politics: अकोला महापालिकेत मोठा ट्विस्ट! पराभूत नेत्यांची पुन्हा एन्ट्री?

By Nilesh Sir

January 19, 2026 4:12 am

Ads

अकोला महानगरपालिका निवडणुकीनंतरचे राजकारण आता थेट ‘स्वीकृत नगरसेवक’ पदांच्या निवडीभोवती केंद्रित झाले आहे. निवडणुकीत तिकीट न मिळालेले तसेच पराभूत झालेले अनेक ज्येष्ठ आणि मातब्बर नेते या पाच स्वीकृत जागांकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. त्यामुळे महापालिकेत ‘मागच्या दाराने’ प्रवेश मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये हालचाली प्रचंड वाढल्या आहेत.

नियमानुसार महापालिकेत पाच स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होते. साधारणपणे १५ निवडून आलेल्या सदस्यांमागे एक स्वीकृत नगरसेवक असे गणित धरले जाते. या निवडीसाठी ठरावीक निकषही आहेत. संबंधित व्यक्तीकडे नागरी प्रशासनाचा अनुभव, विशेष शैक्षणिक पात्रता किंवा महापालिकेच्या कामकाजाची जाण असणे आवश्यक मानले जाते.

तसेच निवडणुकीत ज्या समाजाला थेट प्रतिनिधित्व देता आले नाही, त्या समाजाला स्थान देण्यासाठीही या पदांचा वापर होतो. यंदा काही राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समाज घटकांचे प्रतिनिधित्व देण्याचा मुद्दा चर्चेत असून, त्यामुळे पक्षांतर्गत समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुका, जातीय आणि सामाजिक समीकरणे, तसेच पक्षातील अंतर्गत समतोल लक्षात घेऊनच स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे अकोला महापालिकेतील पडद्यामागचं राजकारण चांगलंच तापलं असून, पुढील काही दिवसांत मोठे राजकीय उलथापालथी पाहायला मिळू शकतात.

Related Article

एकतर्फी प्रेमाचा विकृत सूड? निष्पाप चिमुकल्याची निर्घृण हत्या;

जिवंतपणी कुणी नव्हतं सोबत… मृत्यूनंतर मिळाला माणुसकीचा खांदा! अकोटमध्ये अनोळखी मृतदेहांना सन्मानाने निरोप देणारे पांडुरंग तायडे

जीवाशी खेळ? प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात आढळला डॉक्टरांचा ग्लोव्ह

चिचखेड फाट्यावर भीषण अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत चारचाकीचा चुराडा, चालक गंभीर जखमी

जन्माआधीच मृत्यूची नोंद!प्रसूती वेदनांपासून मृत्यूच्या वेदनेपर्यंत; एका आईची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

LCB अडचणीत; बुलढाण्यात पोलिसांचा मोठा घोळ? जिच्या हत्येप्रकरणी वडील-भाऊ जेलमध्ये, तीच तरुणी निघाली जिवंत, LCB च्या तपासावर गंभीर प्रश्न

No comments to show.

Leave a Comment