अकोट शहरात अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांचा मोठा घाव; ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

अकोट शहरात अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करत मोठा धक्का दिला आहे. दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी अकोट शहर पोलीस ठाण्याला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शहरातील विविध भागांमध्ये बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याचे समोर आले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले असून तब्बल ७८,०१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत अकोट शहरातील अन्नाभाऊ साठे नगर, जलतारे प्लॉट, अमीनपुरा, टाकपुरा आणि आंबोळी वेस परिसरातून अवैध दारू विक्री करणारे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये चेतन किसन वानखडे (वय २२), भारत उत्तम इंगळे (वय ४८), संगिता संजय कुटे (वय ५०), मुरलीधर शंकर मोहिते (वय ५०) आणि अरुण देविदास तेलगोटे (वय ३१) यांचा समावेश आहे.

पोलीस कारवाईदरम्यान देशी व विदेशी दारूसह रोख रक्कम असा एकूण ७८,०१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने ही मोहीम राबवली असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रशेखर रेडडी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अकोट शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक व कर्मचारी यांनी संयुक्तपणे ही यशस्वी कारवाई केली.

अकोट शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि अवैध दारू विक्रीवर कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!