WhatsApp


Google Pay: ग्राहकांना मोठा धक्का! आता रिचार्ज केल्यावर गुगल पे सुद्धा घेणार जादा पैसे

Share

Google Pay: भारतातील Google Pay वापरकर्त्यांसाठी एक वाईट बातमी आहे. गुगल पे मोबाईल रिचार्जसाठी वेगळे पैसे आकारणार असल्याची बातमी आहे. अनेक वापरकर्त्यांनी दावा केला आहे की त्यांनी Google Pay वर सुविधा शुल्काच्या नावाखाली पैसे घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत गुगल पेद्वारे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागत नव्हते, परंतु आता तुम्हाला ते द्यावे लागणार आहेत.

akola news WhatsApp number
akola news WhatsApp number

गुगलने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, मात्र अनेक सोशल मीडिया यूजर्सने हा दावा केला आहे. PhonePe आणि Paytm या कंपन्या मोबाइल रिचार्जसाठी अतिरिक्त शुल्क आकारत आहेत. जेव्हा या कंपन्यांनी रिचार्जसाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यास सुरुवात केली तेव्हा Google ने सांगितले होते की त्यांच्या Google Pay वर मोबाइल रिचार्जवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकरले जाणार नाही.

मुकुल शर्मा यांनी ट्विटरवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे ज्यामध्ये Jio च्या 749 रुपयांच्या रिचार्जसाठी, Google Pay 752 रुपये आकारत आहे. ज्यामध्ये सुविधा शुल्क म्हणून 3 रुपये जोडले आहेत. हे सुविधा शुल्क अॅपद्वारे UPI आणि कार्ड पेमेंट मोडमध्ये भरावे लागेल.

akola sarafa

रिपोर्टनुसार, 100 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रिचार्जसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही. 200-300 रुपयांपर्यंतच्या रिचार्जसाठी 2 रुपये आणि त्यापेक्षा जास्त रिचार्जसाठी 3 रुपयांचे शुल्क भरावे लागेल.

Google Pay किती सुविधा शुल्क आकारात आहे?

▪️ १०० रुपयांपर्यंतच्या मोबाइल रिचार्जवर कोणतेही शुल्क नाही

▪️ १०१ ते २०० रुपयांपर्यंतच्या मोबाइल रिचार्जवर १ रुपया सुविधा शुल्क

▪️ २०१ ते ३०० रुपयांपर्यंतच्या मोबाइल रिचार्जवर २ रुपये सुविधा शुल्क

▪️ ३०१ रुपयांच्या वरील मोबाइल रिचार्जवर ३ रुपये सुविधा शुल्क

▪️ ३०१ रुपयांपेक्षा जास्त कितीही रिचार्ज अमाऊंट असली तरी सुविधा शुल्क ३ रुपयेच असेल.

Leave a Comment

error: Content is protected !!