WhatsApp


Prakash Ambedkar । हृदयात रक्ताची गुठळी; प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक ३१ ऑक्टोंबर :- Prakash Ambedkar वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांना गुरुवारी पहाटे छातीदुखीच्या त्रासामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना वंचित बहुजन आघाडीसाठी मोठा हादरा मानला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,त्याच्या हृदयात रक्ताची गाठ झाली असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. Prakash Ambedkar “बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवार ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील ३ ते ५ दिवस ते निरक्षणात राहणार आहे” अशी माहिती वंचित बहुजन आघाडीने ‘एक्स’ या सोशल मीडियावरील अकाऊण्टद्वारे दिली आहे. तसेच कुटुंबाच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा कारण ते या परिस्थितीला सामोरे जात आहेत अशी विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान, वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस VBA च्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!