Ads

अकोटसह 84 खेड्यांना दोन दिवस ‘पाणी ब्रेक

By Nilesh Sir

August 9, 2026 5:23 pm

Ads

अडगाव येथील पाणीपुरवठा बंद झाल्याने व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम तसेच अकोट शहरातील जलशुद्धीकरण केंद्रावर स्वच्छतेचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे अकोट शहरासह अकोट 84 खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, हिवरखेड, अडगाव आणि तेल्हारा शहराचा पाणीपुरवठा 11 आणि 12 ऑगस्ट 2026 रोजी बंद राहणार आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अकोट उपविभागाकडून याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली आहे. अडगाव येथील पाणीपुरवठा बंद झाल्याने संबंधित व्हॉल्व्हची दुरुस्ती करणे आवश्यक असून, त्यासोबतच अकोट शहर जलशुद्धीकरण केंद्रावरील स्वच्छतेचे कामही करण्यात येणार आहे.

या कामामुळे 11 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2026 या कालावधीत संबंधित शहर व गावांमध्ये पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, दुरुस्ती व स्वच्छतेचे काम शक्य झाल्यास एकाच दिवसात पूर्ण करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिली आहे.

मात्र, कामाचा कालावधी वाढल्यास नागरिकांना आणखी काही काळ पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रशासनाने काम वेळेत पूर्ण करून पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरू करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

एन. के. राऊत, उपविभागीय अभियंता (प्र.), महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उपविभाग अकोट यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

कुठे पाणीपुरवठा बंद राहणार?

  • अकोट शहर
  • अकोट 84 खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना
  • हिवरखेड
  • अडगाव
  • तेल्हारा शहर

कालावधी : 11 व 12 ऑगस्ट 2026

नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेची दखल घेत पाण्याचा अपव्यय टाळावा आणि आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!