WhatsApp

पत्रकार आणि पोलिसांची संवेदनशीलता उष्माघाताने तडफडत पडलेल्या इसमाला मिळाले जीवदान

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक २१ एप्रिल प्रतिनिधी गणेश बुतेटे :- ४० अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमानाने संपूर्ण महाराष्ट्र धगधगत असताना नेहमीच सर्वात जास्त तापमानाची नोंद असणाऱ्या अकोला जिल्ह्यात पशू पक्षासह मानवालाही उन्हाची झळ बसत आहे. दुचाकीने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांला उष्माघाताचा फटका बसला, तो अत्यवस्थ होऊन खाली पडला होता. मात्र काही संवेदनशील पत्रकारांच्या साहाय्याने आणि पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली त्या व्यक्तीचा जीव वाचविण्यात यश आले.

हकीकत अशी की, दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत चौहट्टा बाजार ते अकोट रोडवर विद्युत केंद्राजवळ एक इसम भर उन्हात अत्यवस्थ अवस्थेत पडला होता. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्यामुळे या परिसरात सभा रॅली यामुळे पोलिसांचा बंदोबस्त तसेच पत्रकारांची रेलचेल सुरू आहे. त्याचवेळी ट्रॅफिक हवालदार केशव मोंढे, दहीहंडा पोलीस बीट जमादार सुरेश यादव , पो.कॉ. राहुल खांडवाये, ना. पो. कॉ. प्रविण पेठे हे दिवसा गस्तीवर असताना स्थानिक रसवंती चालक सुभाष किरडे यांनी एक इसम रस्त्यावर पडलेला असल्याची माहिती दिली.

दरम्यान एका सभेतून सुनील बांगर, पूर्णाजी खोडके, गणेश बूटे हे पत्रकार या पत्रकारांनाही या प्रकाराची कुणकुण लागताच पोलीस आणि पत्रकारांनी या ठिकाणी धाव घेत रस्त्यावर भर उन्हात पडलेल्या त्या इसमाला उचलून सुरक्षित ठिकाणी आणले. शुद्धीवर नसल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांना ही माहिती देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली इसमाच्या ओळखपत्राची पाहणी करत ओळख पेटविली. हा इसम वर्धा येथून बिड येथे जण्यासाठी दुचाकीने निघाला होता. मात्र रस्ता चुकल्याने तो इसम अकोट अकोला मार्गावर पोहचला .

त्याला उष्माघाताचा फटका बसल्यामुळे अत्यवस्थ अवस्थेत रस्त्यावर पडला होता. मात्र पोलीस आणि पत्रकार यांनी या इसमाला प्राथमिक उपचार देत त्याला फळाचा रस पाजला आणि तो इसम शुद्धीवर येताच सर्वांच्या जीवात जीव आला. यावेळी पत्रकार आणि पोलीस उपाठीत नसते तर या इसमाला आपल्या जीवाला मुकावे लागले असते. मात्र या इसमाचा जीव वाचाविल्यामुळे पत्रकार आणि पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच दहीहंडा पोलीस ठाण्यात नवनियुक्त पोलीस ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांनी सूत्रे हातात घेताच या परिसरात अनेक चांगले बदल घडत असल्याची चर्चा या परिसरात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!