WhatsApp

Youtube वर व्हिडिओ केव्हा करावा पोस्ट? कधी पडेल लाईक आणि व्ह्यूजचा पाऊस

अकोला न्युज नेटवर्क दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ :- जर तुम्हाला सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे असेल तर ही माहिती तुमच्या उपयोगी पडू शकते. सध्या अनेक जण युट्यूबवर त्यांचे व्हिडिओ पोस्ट करतात. काही जण तर नियमीत व्हिडिओ पोस्ट करतात. पण त्यांना हवा तसे व्ह्यूज आणि लाईक मिळत नाही. तुमचा कंटेट दमदार असेल. व्हिडिओ पण कमाल एडीट केला असेल तर सर्वात महत्वाचे असते टायमिंग ! युट्यूबवर योग्य वेळी व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला भरपूर व्ह्यूज आणि लाईक मिळतील.

युट्यूबवर कसे वाढतील व्ह्यूज
युट्यूबवर व्ह्यूज आणि लाईक प्रत्येकाला हव्या आहेत. कामाची दाद मिळायला हवी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. युट्यूबवर व्ह्यूज आणि लाईक मिळवण्यासाठी अनेक जण सूचनांचे पालन करतात. तरीही लाईकचा पाऊस पडत नसतील तर या काही टिप्स तुमच्यासाठी महत्वाच्या ठरतील. व्हिडिओ कंटेंट क्वालिटी, ट्रेंड फॉलोसह व्हिडिओ अपलोड करण्याची योग्य वेळ महत्वाची आहे. मग आता व्हिडिओ अपलोड करण्याची योग्य वेळ कोणती असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर चला जाणून घेऊयात..

यावेळेला करा व्हिडिओ पोस्ट
युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी योग्य वेळी ती असते ज्यावेळी युझर्स सर्वाधिक सक्रीय असतोत. म्हणजे ते युट्यूबवर व्हिडिओ पाहण्यासाठीची वेळ ही महत्वाची असते. सकाळी 6 वाजता, 9 वाजता आणि 12 वाजता, यावेळी जास्तकरुन युझर्स एक्टिव्ह असतात. तर दुपारी 3 वाजता, संध्याकाळी 6 वाजता आणि रात्री 9 आणि 11 वाजता व्हिडिओ अपलोड करता येऊ शकते. आठवड्याच्या शेवटी या वेळेत थोडाफार बदल असतो. या वेळेत मोठ्या प्रमाणात युझर्स हे त्यांच्या सोशल मीडियावर असतात. या काळात ते व्हिडिओ स्क्रोलिंग करत असतात.

व्हिडिओत या गोष्टींचे ठेवा भान
कंटेंट क्रिएटर्सला नियमीत व्हिडिओ पोस्ट करणे आवश्यक आहे. वेगवेगळे कंटेंट आणि विषय ट्रेंडिंग असावेत. तसेच वेळोवेळी लाईव्ह करणे पण आवश्यक आहे. नाहक ओढताण केलेले व्हिडिओ युझर्सला आवडत नाही. योग्य माहिती आणि योग्य वेळ अत्यंत महत्वाची आहे. कम्युनिटी गाईलाईन्सचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. या टिप्स फॉलो केल्या तर व्हिडिओवर लाईक आणि व्ह्यूजचा पाऊस पडेल.

Leave a Comment

error: Content is protected !!