अकोला न्युज नेटवर्क दिनांक १३ मार्च २०२४ :- अकोला शहरातील मालमत्ता कर वसूलीवरून वंचित बहुजन आघाडीचा आयुक्तांना इशारा. दोन दिवसात निर्णय घ्या अन्यथा करणार तीव्र आनोलन :- आयुक्त डॉ. सुनील लहाने यांना निवेदन
अकोला वंचित बहुजन आघाडीने मुंबई येथे पाच दिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान राज्य अवर सचिव यांनी दिलेल्या निर्देशानुसार अकोला महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी मालमत्ता कर वसूली संदर्भात अभ्यास करून निर्णय घेण्याची सकारात्मक चर्चा करून दोन दिवसात या बाब काय तो निर्णय घेण्यात आला नाही तर वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलने करणार असल्याचा इशारा देखील या वेळी देण्यात आला.
अकोला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबई येथे पाच दिवसीय धरणे आंदोलन केल्यानंतर राज्य शासनाच्या अवर सचिव यांच्या निर्देशानुसार अकोला महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी मालमत्ता कर वसूली संदर्भात चर्चा केली. या चर्चेदरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मालमत्ता कर वसूलीची पद्धत चुकीची असल्याचे सांगितले.
पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांच्या आत मालमत्ता कर वसूली ठेका रद्द करण्याची मागणी केली असून अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा निवेदन द्वारे दिला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीने मालमत्ता कर आकारणी चुकीच्या पद्धतीने केली जात असल्याचा आरोप केला. महानगरपालिकेच्या प्रतिनिधींनी हा मुद्दा गंभीरपणे घेत यासंदर्भात आवश्यक अभ्यास करण्याचे आश्वासन दिले आहे. आगामी दोन दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा पर्याय अवलंबण्याची शक्यता आघाडीने वर्तविली आहे.
मनपा आयुक्तांच्या दालनात यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर, महीला आघाडी प्रदेश महासचिव अरुंधतीताई शिरसाट, पुर्व महानगर अध्यक्ष शंकरराव इंगळे, पश्चिम महानगर कार्याध्यक्ष मजहर खान, निलेश देव, महीला आघाडी महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.