WhatsApp

Trending News: भल्याभल्यांना लाजवेल अशी इंग्रजी बोलतोय अमरावतीतील रिक्षाचालक; व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक!

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक ११ जुलै :-Trending News सोशल मीडियावर अनेक हटके व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात तर कधी कोणी डान्स करताना दिसतात. काही लोक त्यांच्या आजुबाजूला दिसणारे हटके व्हिडीओ शेअर करतात.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अमरावतीचा ऑटो चालक इंग्रजीमध्ये बोलण्याचा सल्ला देताना दिसतात. Trending News हा व्हिडीओ पाहून तुम्हीही तुम्हीही अवाक् व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल एक ऑटो चालक काका दोन तरुणांना इंग्रजीचे महत्त्व पटवून सांगतात. एक तरुण त्यांच्या रिक्षामध्ये बसला आहे तर दुसरा तरुण त्यांचा व्हिडीओ शूट करताना दिसत आहे.

Trending News काका इंग्रजीमध्ये बोलत इंग्रजी किती महत्त्वाची आहे, हे समजून सांगताना दिसतात. त्याची स्पष्ट इंग्रजी पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अमरावती शहरातील आहे.

“मी तुम्हाला जे सांगतोय, माझं बोलणं खूप लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला इंग्रजी येत असेल तर तुम्ही लंडन, पॅरिस, अमेरिकेला जाऊ शकता… जर तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर तुम्ही तिथे जाऊ शकत नाही” Trending News असे रिक्षाचालकाने व्हिडिओत म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी इंग्रजीचे महत्त्व अधोरेखित करणारे उदाहरण दिले.

रिक्षाचालकाने सांगितले की, “जर तुम्ही लंडनच्या हॉटेलमध्ये असाल आणि वेटरकडे एक ग्लास भरलेले पाणी मागितले तर तो तुम्हाला एक ग्लास पूर्ण पाणी देईल. पण तुम्ही वेटरकरडे मराठी भाषेत पाणी मागितले, ते त्याला समजणार नाही आणि तो तुम्हाला तिथून निघून जाण्यास सांगेल. Trending News म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही इंग्रजी शिका, ती एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे”, असे ते म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!