Total reservation percentage in Maharashtra : महाराष्ट्रात कोणत्या जातींना किती टक्के आरक्षण! वाचा मराठा आरक्षणासंदर्भात A टू Z माहिती

Total reservation percentage in maharashtra : गेल्या कित्येक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. मात्र आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्दयाने डोके वर काढून हिंसक वळण धारण केले आहे. छत्रपती संभाजीराजे, छत्रपती उदयनराजे यांच्या पाठोपाठ मनोज जरांगे यांनी आरक्षणाचा विषय चांगलाच उचलून धरला आहे. सकल मराठा समाजाने आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा दिला आहे.

त्यामुळे राज्य सरकारला चांगलाच घाम फुटला आहे.मराठा समाजाने राज्यातील अनेक नेत्यांच्या घरांची व कार्यालयाची तोडफोड केली आहे. अशातच आता महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्यांविरोधात FIR नोंदवण्यात आली आहे.

मराठा आंदोलकांनी बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आमदारांची घरे आणि कार्यालये जाळल्यानंतर ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा निषेध करत मराठा समाजाच्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. त्यामुळे आज मंत्रिमंडळात बैठकांना वेग आला आहे.

मराठा समाजाची नेमकी मागणी काय आहे? reservation percentage in Maharashtra


राज्यभर मराठा समाज आरक्षणासाठी धडपड करत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. तर कित्येक विद्यार्थी आरक्षणासाठी लढत आहेत. मात्र सकल मराठा समाजाची नेमकी मागणी काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? तर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणात व नोकऱ्यांमध्ये 16 टक्के आरक्षण मिळावे.

तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षण कोट्यामध्ये मराठा समाजाचा समावेश करून घ्यावा ही सर्वात मोठी मागणी मराठा समाजाची आहे.

महाराष्ट्रात कोणत्या जातींना किती टक्के आरक्षण आहे? (What percentage reservation for which castes in Maharashtra?)

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात ठिकठिकाणी दंगली, जाळपोळ होत आहेत. अनुसूचित जाती जमातीला, इतर मागासवर्गीयांना, विशेष मागास प्रवर्गाला आरक्षण आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण नसल्याने आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी आंदोलन करत आहेत.

मात्र महाराष्ट राज्यात कोणत्या जातीला किती टक्के आरक्षण आहे हे तुम्हाला माहित आहे का? तर याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

akola news whatsspp nomber
akola news whatsspp nomber

(What percentage reservation for which castes in Maharashtra?)

1) एससी : 13 टक्के
2) एसटी : 07 टक्के
3) ओबीसी : 19 टक्के
4) विमुक्त + भटक्या जाती (4 प्रवर्ग) : 11 टक्के
5) एसबीसी अ : 02 टक्के
6) एकूण आरक्षण : 52 टक्के

महाराष्ट्रात एकूण 52 टक्के आरक्षण दिले जात असले तरीसुद्धा आरक्षणाच्या यादीत EWS ला 10 टक्के आरक्षण दिले जात आहे. (What percentage reservation for which castes in Maharashtra?) त्यामुळे महाराष्ट्र राज्यात एकूण मिळून 62 टक्के आरक्षण नोकरी व शिक्षणात दिले जात आहे. त्यामुळे मराठा समाजाला राज्य सरकार किती टक्के आरक्षण देणार याकडे मराठा समाजासह सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जाणून घेऊयात कोणत्या राज्यात किती टक्के आरक्षण आहे?
हरियाणा आणि बिहार : एकूण 60 टक्के आरक्षण
तेलंगणा : एकूण 50 टक्के आरक्षण
गुजरात : एकूण 59 टक्के आरक्षण
तामिळनाडू : एकूण 69 टक्के आरक्षण
छत्तीसगड : एकूण 82 टक्के आरक्षण
मध्यप्रदेश : एकूण 73 टक्के आरक्षण
झारखंड : एकूण 50 टक्के आरक्षण
राजस्थान : एकूण 64 टक्के आरक्षण
केरळ : एकूण 60 टक्के आरक्षण

मनोज जरांगे नेमके आहेत तरी कोण? (What percentage reservation for which castes in Maharashtra?)

आता कित्येक नागरिकांना प्रश्न पडला असेल कि नेमके मनोज जरांगे आहेत तरी कोण? तर मनोज जरांगे हे जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावातील रहिवासी आहेत. ते गेल्या 10 ते 15 वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत. यापूर्वी ते काँग्रेस पक्षात काम करत होते. मात्र काही कारणास्तव त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत शिवबा संघटनेची स्थापन केली.

जरांगे पाटील हे 2011 या वर्षापासून मराठा आरक्षणाच्या चळवळीत आहेत. त्यांच्या 2024 मध्ये औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर एक भव्य मोर्चा काढला होता. त्यावेळी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला चांगलाच घाम फोडला होता. त्यांनी आत्तापर्यंत 35 हून अधिक मोर्चे व आंदोलने केली आहेत, आणि आता पुन्हा मराठा आरक्षणावरून ते चर्चेत आले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!