WhatsApp

न्यायाधीशांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे लागली भीषण आग घरातील साहित्य जळून खाक The house caught fire due to short circuit

अकोला न्यूज नेटवर्क, स्वप्निल सुरवाडे पातूर :- पातूर येथील काले खान नगर, दत्त लेआऊट मधील एका घराला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. The house caught fire due to short circuit सोमवारी (ता. ६) सायंकाळी ६:४० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आरिफ उर रहमान यांचे कुटुंब दत्त नगर लेआऊट, काले खान नगर येथे राहते व त्यांचे लहान भाऊ मो.शारीक उर रहमान हे पेशाने न्यायाधीश आहेत त्यांचे कुटुंबीय कामासाठी बाहेर पडल्यानंतर त्यांच्या घरात शॉर्टसर्किट होऊन घराला आग लागली. घरातील किचनमध्ये मोठ्या प्रमाणात सामान व फ्रीज, मिक्सर इत्यादी इलेक्ट्रॉनिक सामान असल्याने आग पसरली आणि आगीचे लोट घराबाहेर येऊ लागले. त्यामुळे परिसरात घबराट पसरली.

दरम्यान, या घटनेची माहिती तातडीने पातूर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला कळविण्यात आली. माहिती मिळताच त्वरित अग्निशमन विभागाचे चालक सैय्यद अश्फाक हे अग्निशामन बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले फायरमन प्रल्हाद वानखडे व जवानांनी काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळवले.

घरातील फर्निचर व इतर सामानाला लागलेली आग काही वेळ सुरु होती. काही वेळाने घरातून मोठ्या प्रमाणात धूर येवू लागला. हा धूर इमारतीसह परिसरात पसरल्याने नागरिकांची धावपळ उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीतील अन्य नागरिकांना घरातून सुखरूप खाली आणले.

आरिफ उर रहमान यांचे स्वयंपाक घर या आगीत जळून खाक झाले आहे. सुदैवाने घरात कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, आगीचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!