The Burning Truck अकोला-अमरावती महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार, चालक आणि क्लिनर सुदैवाने बचावले!

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक 2 जून 2024 :- The Burning Truck आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास अकोला-अमरावती राष्ट्रिय महामार्गावरील शिवणी विमानतळ समोर एका मालवाहतूक ट्रकला अचानक आग लागली. या आगीत ट्रकचा समोरील भाग जळून खाक झाला आहे. यामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

ट्रक चालकाला चालत्या ट्रकमधून धूर निघत असल्याचे दिसून आले. The Burning Truck त्यामुळे त्याने त्वरित वाहन रस्त्यावर थांबवले आणि स्वतः आणि क्लिनर यांना गाडीच्या बाहेर काढले. सुदैवाने या आगीत दोघेही जण सुरक्षित आहेत.

ट्रकला आग नेमक्या कारणामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक तात्काळ दाखल झाले आणि त्यांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले.

या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ उपाययोजना राबवल्या. The Burning Truck

अग्निशमन दलाचे अधिकारी यांनी सांगितले की, आगीचे कारण अद्याप तपासण्यात येत आहे. तसेच, आग लागण्यामुळे किती नुकसान झाले आहे याचीही माहिती घेतली जात आहे.

या घटनेमुळे अकोला-अमरावती महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. वाहनचालकांनी महामार्गावरून प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. The Burning Truck

Leave a Comment

error: Content is protected !!