WhatsApp

Teacher’s suicide with her son in Akola वर्धा येथील शिक्षिकेची मुलासाह अकोल्यात आत्महत्या ; चिठ्ठी लिहून केली आत्महत्या पहा काय आहे नेमके प्रकरण?

akola news WhatsApp number
akola news WhatsApp number

अकोला न्युज नेटवर्क :- Teacher’s suicide with her son in Akola अकोला शहरानजीक असलेल्या कुरणखेड येथील नदीपात्रात आपल्या सहा वर्ष वयाच्या मुलासाह महिलेने आत्महत्या केल्याच्या घटनेने शहरात खळबळ तर गावात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्या करण्यापुर्वी या महिलेले चिट्ठी लिहून ठेवली होती

माणसाच्या आयुष्यात कधी काय घडेल हे सांगता येत नाही आई वडील लग्न लावून देतात पण ते टिकणार की नाही हे आजच्या घडीला सांगणे मुश्किलच म्हणावे लागेल भांडणाचे रूपांतर काडीमोड मध्ये होऊन काही नवरा बायको विभक्त राहतात तर काही जोडपे ताटातूट झाल्यावर टोकाची भूमिका घेतात अशीच काहीशी घटना आज सकाळच्या सुमारास बोरगावमंजू पोलीस स्टेशन हद्दीतील कुरणखेड येथे उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली

 Teacher's suicide with her son in Akola
Teacher’s suicide with her son in Akola

काय आहे नेमके प्रकरण? Teacher’s suicide with her son in Akola

वर्धा येथील धनंतोली येथील रहिवासी अश्विनी आष्णेकर वय वर्ष अंदाजे 30 ते 35 वर्ष हि आपल्या पती सोबत विभक्त झाल्या नंतर आपल्या सहा वर्षाचा मुलगा शिवांश सह रजत होती आधीच डोव्होर्स झालेला व त्या नंतर आई वडिलांच्या घरी राहायला असल्याने आपल्या आई वडिलांवर ओझं नको म्हणून वर्धा येथील खाजगी शाळेत नोकरी करण्याचा निर्णय घेतला काही दिवस सुखाने गेल्या नंतर विभक्त्त झालेल्या पतीने त्रास देण्यास सुरवात केली आपल्याला त्रास सहन न झाल्याने आपलं व आपल्या मुलाचं आयुष्य संपवायचा निर्णय अश्विनी हिने घेतला व आज सकाळी रेल्वेने अकोला शहर गाठले आपले व आपल्या मुलाचे आयुष्य संपवयचेच आहे असा ठाम निर्णय घेऊन वैशालीने थेट बोरगाव मंजू पोलीस स्टेशन च्या हद्दीत येत असलेले कुरणखेड येथील मा चंडिका संस्थान गाठले त्या नंतर येथील संस्थानाच्या कार्यालयात आपल्या मुलाची बॅग व आपली बॅग ठेऊन वैशाली व शिवांश याला घेऊन नदी कडे जातांना येथील नागरिकांना दिसली पण बराच वेळ झाल्या नंतर देखील ही महिला व हिचा मुलगा परत आले नसल्याचे पाहून येथील नागरिकांनी बोरगाव मंजू पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले असता वैशालीने आपल्या मुलासाह नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची बाब लक्षात आली पोलिसांनी कुरणखेड येथील माँ चंडिका आपत्कालीन पथक यांना बोलावले असता माँ चंडिका आपत्कालीन बचाव पथक सदस्यांनी शोध मोहीम घेतली असता एक महिला व एक लहान मुलाचा मृतदेह आज मिळाला आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी
आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी

बॅग मध्ये आढळली चिट्ठी Teacher’s suicide with her son in Akola

आपले लग्न झाले त्या नंतर पती सोबत डिव्होर्स झाल आपण आई कडे राहत असल्यानंतर विभक्त झालेला नवरा हा सतत आपल्याला त्रास देत असल्याने मी माझ्या सहा वर्षाच्या मुलासाह आत्महत्या करीत असल्याचे या चिट्ठीत लिहिले असल्याचे दिसून आले.

माँ चंडिका आपत्कालीन पथक कुरणखेड
माँ चंडिका आपत्कालीन पथक कुरणखेड

बोरगाव मंजू पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला स्वरूपच्या रुग्णालय येथे पाठविले असून सदर घटनेची माहिती अश्विनी आष्णेकर यांच्या वर्धा येथील नातेवाईकांना दिली आहे सदर कारवाईत कुरणखेड येथील माँ चंडिका आपत्कालीन पथकाने मोलाची भूमिका निभावली

Leave a Comment

error: Content is protected !!