WhatsApp


मुर्तीजापुर मध्ये भव्य गरबा रास स्पर्धा, सुगत वाघमारे मित्र परिवाराचा उपक्रम

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक ५ ऑक्टोबर संतोष माने प्रतिनिधी मूर्तिजापूर :- डॉ. सुगत वाघमारे मित्र परिवारातर्फे गरबा रास स्पर्धा आणि बक्षीस वितरण समारंभ 5 आणि 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 ते 10 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. लाल शाळा मैदान मुर्तीजापुर या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेत बक्षिसांची लयलूट करण्यात येणार आहे. तरी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सुगत वाघमारे यांनी केले आहे.

डॉ. सुगत वाघमारे हे तिक्ष्णगत संस्थेअंतर्गत काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांसाठी उत्कृष्ट आणि सक्रिय कार्य करत आहेत. महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. सोबतच कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध आघाडींवर सक्रिय कार्यरत आहेत.

याच माध्यमातून डॉ. सुगत वाघमारे मित्र परिवाराच्या वतीने दिनांक 22 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत नि:शुल्क गरबा कार्यशाळेचे आयोजन भक्तीधाम समता नगर आणि हनुमान मंदिर संस्थान स्टेशन विभाग मुर्तीजापुर या दोन ठिकाणी करण्यात आले होते. याचाच समारोपिय कार्यक्रम तसेच गरबा रास स्पर्धा आणि बक्षीस वितरण समारंभ 5 आणि 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 ते 10 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन लाल शाळा मैदान मुर्तीजापुर या ठिकाणी करण्यात आले आहे.

प्रथम बक्षीस 11000/-, द्वितीय बक्षीस 7000/-, तृतीय बक्षीस-5000/- राहणार आहे. तर उत्कृष्ट गरबा रास, उत्कृष्ट कॉस्ट्यूम, उत्कृष्ट मेकअप अशी विविध प्रोत्साहन पर बक्षिसे सुद्धा देण्यात येणार आहेत. त्यासोबतच लहान मुलांसाठी सुद्धा बक्षीसे असणार आहेत.
या गरबा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नि:शुल्क नोंदणी आवश्यक आहे. नि:शुल्क नोंदणी आणि अधिक माहितीसाठी 7058079606/8605095744 या क्रमांकावर संपर्क साधावा.

गरबा रास 2024 या स्पर्धेमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. सुगत दादा वाघमारे मित्र परिवाराने केले आहे. तसेच दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी तिक्ष्णगत कार्यालय या ठिकाणी शारदा देवीची स्थापना करण्यात येणार आहे. मुर्तीजापुर मधील गरबा रास स्पर्धेत सहभागी व्हा, बक्षीस मिळवा : सुगत वाघमारे

मुर्तीजापुर दि. 3 प्रतिनिधी : डॉ. सुगत वाघमारे मित्र परिवारातर्फे गरबा रास स्पर्धा आणि बक्षीस वितरण समारंभ 5 आणि 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 ते 10 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. लाल शाळा मैदान मुर्तीजापुर या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेत बक्षिसांची लयलूट करण्यात येणार आहे. तरी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सुगत वाघमारे यांनी केले आहे.

डॉ. सुगत वाघमारे हे तिक्ष्णगत संस्थेअंतर्गत काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांसाठी उत्कृष्ट आणि सक्रिय कार्य करत आहेत. महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. सोबतच कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध आघाडींवर सक्रिय कार्यरत आहेत.

याच माध्यमातून डॉ. सुगत वाघमारे मित्र परिवाराच्या वतीने दिनांक 22 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत नि:शुल्क गरबा कार्यशाळेचे आयोजन भक्तीधाम समता नगर आणि हनुमान मंदिर संस्थान स्टेशन विभाग मुर्तीजापुर या दोन ठिकाणी करण्यात आले होते. याचाच समारोपिय कार्यक्रम तसेच गरबा रास स्पर्धा आणि बक्षीस वितरण समारंभ 5 आणि 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 ते 10 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन लाल शाळा मैदान मुर्तीजापुर या ठिकाणी करण्यात आले आहे. प्रथम बक्षीस 11000/-, द्वितीय बक्षीस 7000/-, तृतीय बक्षीस-5000/- राहणार आहे. तर उत्कृष्ट गरबा रास, उत्कृष्ट कॉस्ट्यूम, उत्कृष्ट मेकअप अशी विविध प्रोत्साहन पर बक्षिसे सुद्धा देण्यात येणार आहेत. त्यासोबतच लहान मुलांसाठी सुद्धा बक्षीसे असणार आहेत.
या गरबा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नि:शुल्क नोंदणी आवश्यक आहे.

नि:शुल्क नोंदणी आणि अधिक माहितीसाठी 7058079606/8605095744 या क्रमांकावर संपर्क साधावा. गरबा रास 2024 या स्पर्धेमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. सुगत दादा वाघमारे मित्र परिवाराने केले आहे. तसेच दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी तिक्ष्णगत कार्यालय या ठिकाणी शारदा देवीची स्थापना करण्यात येणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!