Shreyas Talpade : श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; नेमकं काय घडलं? जाणून घ्या हेल्थ अपडेट

akola news WhatsApp number
akola news WhatsApp number

Shreyas Talpade: मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती काल बुधवारी समोर आली. अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शुटींगमध्ये श्रेयस सध्या व्यस्त आहे.

चित्रपटाचे शुटींग संपल्यानंतर तो घरी परतला. त्यावेळी त्याला अस्वस्थ वाटले आणि तो लगेच जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने मुंबईतील अंधेरी येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्याच्यावर यशस्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली.

अVsar फॅशन अकोला

श्रेयसची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते चिंता व्यक्त करत होते. मात्र आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. आज किंवा उद्यापर्यंत श्रेयस तळपदेचा डिस्चार्ज मिळू शकतो. श्रेयसच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

नेमकं काय घडलं? Shreyas Talpade

श्रेयस 14 डिसेंबर 2023 रोजी ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाचं शूटिंग करत होता. या सिनेमाच्या शूटिंगनंतर तो सेटवरुन घरी गेला. शूटिंगदरम्यान तो पूर्णपणे ठिक होता. त्यावेळी त्याने अनेक अॅक्शन सीन्सचं शूटिंग केलं. शूटिंगमधून घरी गेल्यानंतर अस्वस्थ असल्याचं त्याने पत्नीला सांगितलं. त्यानंतर त्याला लगेचच रुग्णालयात नेण्यात आले, पण वाटेत त्याला हृदयविकाराचा झटका आला.

अVsar फॅशन अकोला
अVsar फॅशन अकोला

श्रेयस तळपदेने मराठीसह बॉलिवूड आणि साऊथमध्येही उत्तम काम केले आहे. सध्या श्रेयस अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ या बहुचर्चित सिनेमाचं शूटिंग करत आहे. या सिनेमात श्रेयस आणि अक्षयसह रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडिस, कृष्णा अभिषेक परेश रावल, अर्शद वारसी, लारा दत्ता, सुनील शेट्टी, संजय दत्त, तुषार कपूर, राजपाल यादव, जॉनी लिव्हर हे कलाकार देखील आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!