संजय गायकवाड मिरवणुकीत युवकांना पोलिसांचे काठीने मारहाण केल्याचा आरोप

अकोला न्युज नेटवर्क दिनांक १ मार्च २०२४ :- शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) हे पुन्हा एकदा वादात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शिवजयंतीच्या मिरवणुकीत संजय गायकवाड यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये आमदार संजय गायकवाड हे युवकांना मारत असल्याचे दिसत आहे. बुलढाणा शहरातील (Buldhana) ही घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. या मिरवणुकीत आमदार गायकवाड यांनी बॉडीगार्डची काठी घेऊन युवकांना बेदम मारहाण केल्याचे दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आमदार संजय गायकवाड मारहाण करत असताना पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये
आमदार संजय गायकवाड यांचा पुन्हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शिवजयंती मिरवणुकी दरम्यानचा आहे. या मिरवणुकीत आमदार संजय गायकवाड युवकांना पोलीस काठीने मारहाण करताना दिसत आहे. त्यांच्या बॉडीगार्डची काठी घेऊन युवकांना सपासप मारहाण ते करत आहेत. त्यामुळे शिवजयंती मिरवणुकीत गोंधळ उडाल्याचे दिसत आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मारहाण
आमदार संजय गायकवाड काठीने युवकांना मारहाण करत असताना पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहेत. आमदार गायकवाड मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. बुलढाणा शहरातील धक्कादायक घटनेवर पोलिसांकडून काहीच पावले उचलली गेली नाही.

शेत जमीन प्रकरणात गुन्हा
आमदार संजय गायकवाड आणि त्यांचे चिरंजीव मृत्यूंजय गायकवाड अडचणीत आले आहे. शेत जमीन बळकावल्याच्या प्रकरणात त्यांच्यासह काही जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयाने 17 फेब्रुवारी रोजी आदेश दिले होते. अखेर 28 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी नागपूर येथील रिटा यमुनाप्रसाद उपाध्याय न्यायालयात गेल्या होत्या. त्यांनी 12 ऑगस्ट 2021 रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही, असे त्यांनी न्यायालयात म्हटले…

Leave a Comment

error: Content is protected !!