WhatsApp

Robbery ATM Machine 17 लाखांसह आख्खच्या आख्ख एटीएम पळवलं, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

akola news wahatsapp
akola news wahatsapp

बुलढाणा ( Robbery ATM Machine) जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या तामगाव भारतीय स्टेट बँकेचे एटीएम (SBI ATM Center) मशिनच चोरटे उचलून घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मशिनमध्ये तब्बल 17 लाख रुपायांची रोकड होती. या प्रकरणी गुन्हा दाखल (Case Registerd) करण्या आला असून पोलीस तपास करत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे आज पहाटे ही घटना उघडकीस आल्याने पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

एटीएममध्ये प्रवेश करुन गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन मधून रोकड पळविल्याच्या असंख्य बातम्या आपण वाचत आलोय मात्र बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या तामगाव येथे दरोडे खोरांनी हद्दच पार करीत एटीएम मधून सह 17 लाखाची रोकड लंपास त्यामुळे खरोखर ह्या घटनांचा बंदोबस्त करून गुन्हेगारांना संग्रामपूर पोलीस कशे वठणीवर अनातात याकडे आता लक्ष आहे.

नाहीतर सर्वसामान्य जनतेतील विश्वास संपून जाईल असे म्हटले तर चुकीचे नाही , त्यामुळे दबंग कारवाही करून गुन्हेगारांच्या मुसक्या अवळण्याचे आव्हाहन आता संग्रामपूर पोलिसांसमोर असून त्यांनी ताबडतोब शोध मोहीम हाती घेऊन घटनेचा छळा लावणे गरजेचे आहे.

संग्रामपूर येथील चोरीच्या घटनेत चोरटे अति हुशार आहेत. त्यांना माहित होतं की, तामगाव आणि सोनाळा या दोन पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त बावनबिरच्या कार्यक्रमात आहे. म्हणून त्यांनी अख्खी एटीएम मशीनच उचलून नेली…!

तामगाव तत्कालीन ठाणेदार गावंडे यांच्या कारकीर्दीत चोरट्यांनी आवाहन केलं होतं. पण आता मात्र महत्त्वाचं असलेल्या तहसील विभाग “ट्रेझरीत” झालेली चोरी ची घटना… आता पर्यंत तपास लागलं नाही परंतु हे सर्वांना चांगले प्रकारे माहित आहे.. परंतु संग्रामपूर येथे रात्री म्हणजे पहाटे दरम्यान झालेली ही मोठी चोरी असून SBI ATM :एटीएम मधून सह 17 लाखाची रोकड लंपास त्यामुळे खरोखर ह्या घटनांचा बंदोबस्त करून गुन्हेगारांना संग्रामपूर पोलीस कशे पकडतील या कडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे तर हा एवढा मोठा धाडसी दरोडा टाकून या दरोडेखोरांनी चक्क पोलिसांना आवाहन केलं एवढे मात्र खरं..

कंपन्यांचा हलगर्जीपणा!

शहरातील एटीएमची जबाबदारी वेगवेगळ्या खाजगी कंपनीकडे बँकेकडून देण्यात आलेली आहे. मात्र, शहरातील अनेक एटीएम रामभरोसे असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी सुरक्षारक्षक नाही, काही ठिकाणी चांगली अलार्म यंत्रणाच नाही. असे काही एटीएम आहेत ज्या ठिकाणी सीसीटीव्ही देखील सुरु नाहीत. त्यामुळे अशाच एटीएमची पाहणी करून चोर त्यांना टार्गेट करतात. त्यामुळे कंपन्यांचा हलगर्जीपणामुळेच अशा घटना घडतांना अनेकदा समोर आले आहेत. मात्र, याचा बोझा पोलीस यंत्रणेवर पडतो.

Leave a Comment

error: Content is protected !!