WhatsApp

Saptahik Rashibhavishya : ५ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०२३ चे साप्ताहिक राशिभविष्य; असा जाईल हा आठवडा

GTPL News Akola GTPL NEWS, [05-11-2023] Saptahik Rashibhavishya : ५ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०२३ चे साप्ताहिक राशिभविष्य; असा जाईल हा आठवडा

मेष राशी
वक्री गुरु आणि राहू यांची युती अडचणी वाढवणारी असली, तरी घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही. कस लागेल. चित्र स्पष्ट होईल. खरे आणि खोटे यातील भेद कळेल. हा बदल सकारात्मकतेने घ्या. संघर्षाला घाबरू नका. नियमित उपासनेला प्राधान्य द्या. मन:स्थिती बिघडवणाऱ्या माणसांपासून दूर राहा. यामुळे तुमच्यातही सकारात्मक बदल होतील. ६ आणि ७ तारखेला कठीण त्रासदायक कामे टाळा. दैनंदिन जीवनाशी निगडित वस्तूविक्री करणाऱ्या व्यापारी वर्गाला लाभ.

वृषभ राशी
वक्री गुरु-राहू युतीमुळे गेला बराच काळ तुम्ही जमाखर्चाचा मेळ बसवण्याचा प्रयत्न करत आहात. आता तुमच्या मदतीला राशीबदल करणारा बुध आणि शुक्र आलेला आहे. आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होईल. गेल्या काही काळात नुकसान झाले असल्यास ते भरून निघेल. तुमचा शब्द तुम्हाला पाळता येईल. चिंता कमी होईल. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा तणाव कमी होईल. प्रकृतीस्वास्थ्य जपा.

मिथुन राशी
परिचित व्यक्ती, मित्रपरिवार यांच्यासोबत सलोखा वाढेल. आनंदाने काळ व्यक्तीत कराल. नुकसान भरून निघेल. मोठी आर्थिक तजवीज होईल. त्यामुळे येणाऱ्या दिवाळी सणाची तयारी उत्साहाने होईल. मित्रपरिवार, स्नेही यांच्यासोबत मेजवानी, भेटीगाठी होतील; मात्र खाजगी विषयाबाबत गुप्तता राखा. शुक्राच्या राशीबदलाच्या परिणामाने तुमचा आर्थिक ताण कमी होणार आहे. संपलेली बचत भरून निघेल. ६-७ तारखेला मनाविरुद्ध घडणाऱ्या प्रसंगाला तोंड द्यावे लागेल.

कर्क राशी
शुक्राचा राशीबदल अभ्यास, ज्ञानवृद्धी घडवेल. बौद्धिक क्षमता वाढेल. कार्यक्षेत्र, अभ्यास यामध्ये पराक्रम दाखवाल. ६ तारखेच्या बुधाचा राशीबदल या योगात वाढ करणारा आहे. अभ्यासू व्यक्ती, बौद्धिक क्षेत्रातील माणसे आणि सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही ग्रहदशा अतिशय शुभ आहे. हस्तकला, चित्रकला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ ग्रहदशा. ७ तारखेला कठीण, जोखमीची कामे आणि प्रवास टाळा.

सिंह राशी
मन आणि शरीर दोन्हीमध्ये खळबळ माजवून शुक्र तुमच्या राशीतून पुढे गेलेला आहे. तरुण मुलांचे मन स्थिर होईल. विद्यार्थ्यांचे लक्ष शिक्षणात लागेल. विशेष अभ्यासक्रमासाठी चांगले मार्गदर्शन मिळेल. यापूर्वी हातून घडून गेलेल्या त्रासदायक गोष्टींची उजळणी करू नका; परंतु त्यातून बोध घेऊन विवेकाने वागा. खेळाडू, व्यायामपटू यांनी प्रकृती जपावी. सराव करताना सांधेदुखी, मान,कणा यांना दुखापत होण्याची शक्यता. मारुती मंदिरातील दिव्यात तेल वाहावे.

अकोला न्युज व्हाट्सअँप नंबर
अकोला न्युज व्हाट्सअँप नंबर

कन्या राशी
तुमच्याच राशीत असणारा शुक्र तुम्हाला लाभदायक ठरेल. अडलेली कामे वेगाने मार्गी लागतील. नवीन उद्योग-व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर या ग्रहदशेचा तुम्हाला लाभ होईल. विवाहइच्छुक व्यक्तींचे विवाह ठरतील. भावनिक गुंतवणूक, प्रेमसंबंधांमुळे चिंता वाढू शकते. गैरसमज बदनामी होणार नाही, याची काळजी घ्या. ६-७ तारखेला हा अनुभव अधिक येईल. अवेळी, अयोग्य जागी वावर टाळा. गृहस्थाश्रमात खर्च वाढेल.

तूळ राशी
एकाग्रता आणि सातत्यामुळे यश प्राप्त कराल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्ती मोठे यश प्राप्त करतील. अपचन, डोकेदुखी, पित्त याविषयी किरकोळ समस्या जाणवतील. घरगुती उपचाराने आराम मिळेल. स्त्रियांसाठी शुभ ग्रहमान आहे. खर्च वाढला, तरी चिंता करू नका. येणारा काहीकाळ तुमच्या हातात अधिकचे उत्पन्न आणेल. ६-७ तारखेला वादविवाद संभवतात; मात्र तुमचा पक्ष योग्य असेल. तरीही वाद टाळा. उद्योग-व्यवसाय, राजकीय क्षेत्र, सरकार अधिकार पदावर असणाऱ्या व्यक्तींच्या अडचणी दूर होतील.

वृश्चिक राशी
उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबिक आणि व्यावसायिक स्तरावर मनासारख्या घटना घडतील. विद्यार्थ्यांनी मात्र अभ्यासात दक्ष असावे. प्रयत्नांती एकाग्रता साधून अभ्यास करावा. चित्त इतरत्र भरकटणे, अभ्यासाव्यतिरिक्त बाकीच्या गोष्टींमध्ये अधिक उत्सुकता निर्माण होणे व त्यामुळे अभ्यासात दुर्लक्ष होईल, असे ग्रहमान असले, तरी तुम्ही प्रयत्नपूर्वक ते टाळू शकता. विशेषतः विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना पुढील काही काळ प्रगतीकारक जाणार आहे. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना सुवर्णसंधी मिळेल.

धनू राशी
धार्मिक व्यक्तींसाठी उत्तम ग्रहदशा सुरू आहे. तिर्थाटन आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थळांना भेट द्याल. शुक्राचा राशीबदल बढती घडवेल आणि जबाबदारी वाढवेल. ६-७ तारखेला नवीन उलाढाल करू नका. जागरूक राहून कटकटीच्या गोष्टी आटोक्यात ठेवता येतील. गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यातदेखील प्रकृतीच्या थोड्याशा कुरबुरी वाढतील. पित्तविकार वाढण्याची शक्यता. अनुवंशिक त्वचा विकारांचा त्रास असल्यास त्यात काही प्रमाणात वाढ होईल. अपथ्यकारक आहार टाळा.


मकर राशी
शुक्राचा राशीबदल आणि सूर्य-बुध युती लाभ देईल. तुमच्या कर्तबगारीत वाढ करेल. खांद्यावर पडणाऱ्या अतिरिक्त कामाची जबाबदारी सहज पाडाल. लबाड व्यक्तींपासून मात्र सावध राहा.अविवाहितांना मनाजोगे स्थळ मिळेल. जुन्या व्यापारीवर्गाची आवक वाढेल. संतती इच्छुकांना आनंदाची बातमी मिळेल. महिलांसाठी ग्रहमान मध्यम आहे. ६ तारखेला डोकेदुखीचा त्रास संभवतो.

कुंभ राशी
सणसमारंभ येऊन ठेपलेले आहेत; मात्र ग्रहदशा तुम्हाला प्रकृती जपायला सांगत आहे. सूर्य-बुध युती विद्यार्थी दशेसाठी शुभ असली, तरी प्रौढ आणि वृद्ध व्यक्तींना काही प्रमाणात त्रासदायक ठरणार आहे. ताप, मेंदूज्वर आणि मेंदू विकारांची हिस्ट्री असल्यास तज्ञांचा सल्ला घ्या. आजार होण्याची/वाढण्याची वाट पाहू नका. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे आजारपण बळवल्यामुळे कौटुंबिक वातावरण विस्कळीत होण्याची शक्यता आहे. कुलदेवतेला शरण जा.

मीन राशी
नोकरी कायमस्वरूपी होणे किंवा नोकरीमध्ये पदोन्नती होण्याचा योग आहे. आर्थिक आणि आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा शुभ आहे; मात्र तारतम्य जपा. एखादा विषय चुकीच्या पद्धतीने समोर येईल. उर्वरित ग्रहदशा शुभ. राशीबदल करणारा शुक्र कर्तबगारीत वाढ करेल. पती-पत्नी स्नेह अधिक वृद्धिंगत होईल. विवाहासाठी अनुकूल घटना घडतील.

Leave a Comment

error: Content is protected !!