WhatsApp

Rashi Bhavishya : १० मार्च पंचांग: कुंभ व मीनसह ‘या’ ४ राशींना आज गोड बातमी मिळण्याची चिन्हे; आनंदासह धनलाभाचेही संकेत

10th March 2024 Marathi Rashi Bhavishya: १० मार्च २०२४ ला रविवारी माघ महिन्यातील शेवटचा दिवस असणार आहे. दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत अमावस्या तिथी कायम असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार संध्याकाळी ४ वाजून १३ मिनिटांपर्यंत साध्य योग असणार आहे. संपूर्ण दिवस शनीचे नक्षत्र कायम असणार असून रात्री उशिरा १ वाजून ५५ मिनिटांनी पूर्व भाद्रपद नक्षत्र सक्रिय होणार आहे. या दिवशी मेष ते मीन राशींच्या कुंडलीत काय लिहिलंय हे पाहूया.

मेष:- वयाने लहान असणार्‍या लोकांशी मैत्री कराल. गप्पिष्ट लोकांच्यात वावराल. कामाचे योग्य नियोजन कराल. जोडीदाराच्या साथीत रमून जाल. इतरांना सहृदयतेने मदत कराल.

वृषभ:- व्यावसायिक ज्ञान वाढवाल. लेखक, प्राध्यापक यांना प्रगती करता येईल. व्यवहारी हजरजबाबीपणा दाखवाल. हुशारीने स्वत:च फायदा काढून घ्याल. योग्य कल्पकता दाखवाल.

मिथुन:- कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण राहील. तुमच्या वक्तृत्वावर लोक खुश होतील. धोरणीपणे वागणे ठेवाल. काही गोष्टींची शिस्त बाळगावी लागेल. प्रवासाची आवड पूर्ण कराल.

कर्क:- भावंडांच्या वागण्याचा सखोल विचार कराल. मेंदूला जरासा ताण द्यावा लागेल. कफाचे त्रास संभवतात. अति विचारात वेळ वाया जाईल. योग्य अनुमान काढावे.

सिंह:- पत्नीची व्यवहार कुशलता दिसून येईल. जोडीदाराच्या सुस्वभावीपणाचे कौतुक कराल. मानसिक स्थिरता जपावी. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. विरोधकांवर मात करता येईल.

कन्या:- फसवेपणाचा आधार घेऊ नका. इतरांच्या विश्वासास पात्र व्हावे. जुनी भांडणे उकरून काढली जातील. कोणाचाही सल्ला चटकन मान्य करू नका. अविचाराने त्रास वाढू शकतो.

तूळ:- बौद्धिक क्षेत्रात काम करणार्‍यांना दिवस चांगला जाईल. खोट्या गोष्टींचा विरोध करावा. घरगुती शांतता जपावी. प्रवास त्रासदायक ठरू शकतो. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक:- संभाषणात बाजी माराल. नवीन मित्र जोडले जातील. जवळचे नातेवाईक भेटतील. तुमच्यातील प्रेमळपणा दाखवून द्यावा. भावंडांचे वागणे विरोधी वाटू शकते.

धनू:- तुमच्यातील अहंमन्यता वाढू देवू नका. मनाची चलबिचलता सांभाळावी. काही खर्च आटोक्यात ठेवावेत. वैचारिक चलाखी दाखवाल. नवीन गोष्टीत रुची दाखवाल.

मकर:- स्थिर विचार करावेत. बोलतांना सावधगिरी बाळगावी. कलेसाठी वेळ काढाल. धार्मिक ठिकाणी मदत कराल. गैरसमजातून वाद वाढू देवू नका.

कुंभ:- गोष्टींचे आकलन चटकन होईल. बुद्धि चातुर्याने वागाल. स्मरणशक्तीचा चांगला फायदा होईल. अभ्यासूपणे गोष्टी जाणून घ्याल. हसत-हसत संभाषण कराल.

मीन:- उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. बढतीचा योग येईल. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. उधारीचे व्यवहार तूर्तास टाळावेत.

Leave a Comment

error: Content is protected !!