WhatsApp

अकोला पश्चिम पोटनिवडणूक: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून राजेश मिश्रांची उमेदवारी निश्चित?

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक २० मार्च २०२३ :- अकोला जिल्ह्यातील पश्चिम मतदार संघात लोकसभे सोबतच पोटनिवडणुक होणार आहे. आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाल्याने या मतदार संघात निवडणुक होणार आहे. खासदारकी साठी भाजपने अनुप धोत्रे यांच्या नावाला शिक्कामोर्तब करताच घराणे शहीचा आरोपी करत भाजपच्या कोट्यात कही खुशी कही गम असा माहोल पाहायला मिळाला.

अकोला लोकसभा उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज अकोल्यात दाखल झाले.. मात्र अद्याप पर्यंत पोट निवणुकी करीता उमेदवार निश्चित झाला नाही.

तर इकडे उद्धव ठाकरे सेनेने पश्चिम मतदार संघात उद्धव ठाकरे हे राजेश मिश्रा यांच्या नावावर शिक्का मोर्तब करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. आज सिंदखेड राजा येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होती ही सभा आटोपल्या नंतर राजेश मिश्रा याची उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा झाल्याची देखील माहिती प्राप्त होत आहे.

राजेश मिश्रा हे राजकारणी कारकीर्द असलेले राजेश मिश्रा हे दोन टर्म नगरसेवक राहिले असून त्यांची आई तसेच राजेश मिश्रा यांच्या पत्नी देखील नगर सेवक राहून चुकल्या आहेत. अकोला पश्चिम मध्ये राजेश मिश्रा यांची ओळख तळागाळातला नेता म्हणून करण्यात येते राजेश मिश्रा यांना जर आमदारकीचे तिकीट मिळाले तर इतर पक्षांना या निवडणुकीत चांगलाच जोर लावला लागणार आहे.

घराणे शाहीचा आरोप झेळणारी भाजप अकोला पश्चिम मध्ये नेमकी कोणाला तिकीट देते कोंग्रस पक्ष हा उद्धव ठाकरे सेनेशी हात मिळवणी करतो की आपला स्वतंत्र उमेदवार उभा करतो वंचित बहुजन आघाडी चे सर्वसर्वे बाळासाहेब आंबेडकर काय गनिमी कावा खेळत या पोट निवडणुकी करीता उमेदवार उभा करता ही येणारी वेळच ठरवले मात्र यंदाची निवडणूक ही अकोला जिल्ह्यात फार अटीतटीची होणार असून मतदारांचा मात्र केमिकल लोचा नक्की होणार हे दिसून येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!