अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो स्वप्निल सुरवाडे प्रतिनिधी पातूर: आज दिनांक ०१ मार्च २०२४ रोजी पातूर येथे एका प्रामाणिक पोलीस हवालदाराने ६०,००० रुपये किमतीचा आयफोन हॅन्डसेट एका तासात मुळ मालकाच्या ताब्यात सुपूर्द केल्याने त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
घटनेचा तपशील:
आर्यन विवेक अलोने (वय १९ वर्षे, रा. डाबकी रोड, अकोला) हे १ मार्च रोजी अकोला येथून पातूर रोडने येत होते. तेव्हा त्यांचा आयफोन हॅन्डसेट रस्त्याच्या कडेला जुने बसस्टॅन्ड पातूर येथे अॅटो स्टॅन्डजवळ रिंग वाजत असताना गहाळ झाला.
तेथे उपस्थित कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार योगेश गेडाम (ब.नं. ५८१, पो.स्टे. पातूर) यांना हा मोबाईल हॅन्डसेट कचऱ्यात वाजत असताना आढळला. त्यांनी ताबडतोब ठाणेदार किशोर शेळके यांना घटनेची माहिती दिली.
ठाणेदार शेळके यांनी मोबाईलवरून मुळ मालक आर्यन अलोने यांना फोन लावून त्यांचा मोबाईल पातूर पोलीस स्टेशनला असल्याची माहिती दिली. त्यानंतर आर्यन अलोने यांनी कागदपत्राची पूर्तता करून एका तासात पातूर पोलीस स्टेशनला पोहोचून हवालदार योगेश गेडाम, एएसआय अरविंद पवार, वसंता राठोड आणि रेखा तोडसाम यांच्या उपस्थितीत त्यांचा मोबाईल हॅन्डसेट परत घेतला.
पोलिसांचे कौतुक:
पोलिस हवालदार योगेश गेडाम यांच्या प्रामाणिकपणा आणि त्वरित कारवाईने मुळ मालक आर्यन अलोने यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या या कृतीचे नागरिकांनी आणि स्थानिक प्रशासनाने कौतुक केले आहे. हा प्रसंग एका प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्याचे उत्तम उदाहरण आहे.
पातूर पोलीस स्टेशन कडुन असे आव्हान करण्यात येते की यापुढे नागरिकांना मोबाईल हॅन्डसेट मिळुन आल्यास पो.स्टे. आणुन जमा करावे. :- पोलिस निरीक्षक किशोर शेळके पातूर