दुर्दैवी घटना अकोल्यातील ९ वित शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन केली आत्महत्येची

अकोला न्युज नेटवर्क दिनांक १० मार्च २०२४ :- अकोल्यातील सिंधी कॅम्प परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. गुरू नानक विद्यालयात ९ वी मध्ये शिकणाऱ्या १५ वर्षीय अल्तमश बेग इम्रान बेग या विद्यार्थ्याने ९ मार्च रोजी रात्री आपल्याच घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अल्तमशने आत्महत्या का केली याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत.

अल्तमशच्या आत्महत्येसाठी त्याचे पालक व परिसरातील नागरिक शाळा प्रशासन व शिक्षकांना जबाबदार धरत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, शिक्षकांच्या वागणुकीमुळे अल्तमशने हा निर्णय घेतला. मृतक विद्यार्थ्याच्या पालकांनी व नागरिकांनी खादान पोलीस स्टेशनमध्ये जमून याबाबत तक्रार नोंदविली आहे.

घटनेची माहिती लागताच मृतक विद्यार्थ्याचा परिवार व शेकडो नागरिक रात्रीच पोलीस स्टेशनवर गेले होते. खादान पोलीस पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र अद्याप अल्तमशने आत्महत्या का केली याची कारणे स्पष्ट झालेली नाहीत.

मुलांवरील ताण कमी करण्यासाठी शाळा व पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मुलांना त्यांच्या समस्या व्यक्त करू देणे महत्त्वाचे असते.अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!