अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक २७ जुलै २०२४ :-No whatsapp सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे व्हॉटसअप आणि टेलेग्राम ही दोन संपर्कासाठीची अप्स वापरता येणार नाही. यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारी कामासाठी फक्त ‘संदेश इन्स्टंट मेसेजिंग’ अपच वापरावे लागणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील आदेश शुक्रवारी जारी केला आहे.
No whatsapp राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) द्वारे विकसित करण्यात आलेल्या ‘संदेश’ अपचा वापर केंद्र शासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी, विविध – राज्य शासनांमधील 200 हून अधिक शासकीय संस्था करत आहेत. 350 हून अधिक ई-गव्हर्नन्स अप्लिकेशन्समध्ये संदेश सूचना आणि ओटीपी पाठवण्यासाठी केला जात आहे.
केंद्रद्वारे विकसित करण्यात आलेल्या ‘संदेश’ अपचा वापर करण्याबाबत सर्व विभाग आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय कार्यालयांना सूचना देण्यात येत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांना इतर सोशल मीडिया No whatsapp अप वापरण्याची सवय झाल्यामुळे त्यांना या आदेशामुळे थोड्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
का घेण्यात आला निर्णय ? No whatsapp
संस्थेच्या स्तरावर प्रोफाइल तपशिलाची दृश्यमानता (Visibility) लपवण्याची सुविधा आहे. संदेश सुरक्षितपणे पाठवणे आणि प्राप्त करणे, सुरक्षितपणे स्टोअर करणे, ओटीपी पाठवणे व वितरित न झालेला डेटा सुरक्षित ठेवणे यासाठी शासन व शासकीय कार्यालये यांच्या गरजेनुसार अनुकूलित करण्याची सुविधा आहे. एनक्रिप्टेड मेसेज आणि फाइल्स पाठवण्यासाठी egov अॅप्लिकेशन्ससह सेवा आधारित एकीकरण यात आहे. अनौपचारिक आणि अधिकृत गट तयार करण्याची सुविधाही यात आहे.
‘संदेस’ची वैशिष्ट्ये…
१ ) ‘संदेस’ सुरक्षित पाठविणे व प्राप्त करणे, साठवण, ओटीपी देणे व वितरित नं झालेला डेटा सुरक्षित ठेवणे.
२ ) शासन गरजेनुसार अनुकूलीत ( कस्टमाईझ ) ची सुविधा.
३ ) सेवा आधारित एकीकरण
४ ) अनौपचारिक व अधिकृत गट तयार करण्याची सुविधा.
५) एसएमएस ऐवजी ओटीपी, अलर्ट, सूचना व प्रसारण करणारी सुरक्षित व विनाशुल्क प्रणाली.
६ ) सत्यापीत व सार्वजनिक वापरकर्त्यामधील पृथक्करन.
७ ) संदेस पोर्टल मार्फत शासकीय वापरकर्त्याच्या पडताळणीचा पर्याय.
८ ) संस्थेच्या स्तरावर प्रोफाइल तपशीलांची दृश्यमानता लपविण्याची सुविधा.
९ ) शासनासाठी योग्य जिओमी ( शासकीय इमोजी ) व टॅगसह तयार संवाद.
१० ) डेस्कटॉप व लॅपटॉपसाठी