WhatsApp


NEET 2024: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णयः विद्यार्थी पुन्हा परीक्षा देणार, NEET चे ग्रेस मार्क्स रद्द

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक १३ जून २०२४ : NEET 2024 परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने NEET2024 वादावर सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की जे विद्यार्थी पुन्हा परीक्षेला हजर होणार नाहीत त्यांना ग्रेस मार्क्स गमवावे लागतील’

या प्रकरणात, ज्यांना ग्रेस गुण देण्यात आले होते अशा 1563 नवीन UG 2024 उमेदवारांचे स्कोअर-कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्राने सुप्रीम कोर्टाला कळवले आहे . या 1563 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याचा पर्याय दिला जाईल, असे केंद्राने म्हटले आहे. या संदर्भात सुप्रीम कोर्टाने एनटीएला(NTA ) दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.

समितीचे मत आहे की 1563 उमेदवारांना NEET 2024 परीक्षेसाठी पुन्हा बसावे लागेल. 1563 उमेदवारांना दिलेली सर्व स्कोअरकार्ड रद्द केली जातील. फेरपरीक्षा घेतली जाईल, जे या फेरपरीक्षेत बसले नाहीत त्यांना भरपाईच्या गुणांशिवाय परीक्षेला बसावे लागेल. अशी माहिती एनटीएचे वकील कनू अग्रवाल यांनी सुप्रीम कोर्टाला दिली.

Leave a Comment

error: Content is protected !!