Nana Patole Accident नाना पटोलेंच्या वाहनाला ट्रकची धडक; अपघात नव्हे, चिरडण्याचा प्रयत्न, काँग्रेसच्या दाव्याने खळबळ !

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १० एप्रिल :-

Nana Patole Accident लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना विदर्भामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्यात प्रचार दौऱ्यावर असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या ताफ्यामधील एका वाहनाला ट्रकने धडक दिली.सुदैवाने या कारमध्ये नाना पटोले नसल्याने ते बचावले. आता या आपघातानंतर काँग्रेसकडून सत्ताधारी भाजपावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत..

नाना पटोलेंच्या ताफ्यातील कारला झालेल्या अपघातानंतर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल विचारला आहे.Nana Patole Accident याबाबत केलेल्या ट्विटमध्ये अतुल लोंढे म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या कारला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे.

ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंका आहे, असा आरोप लोंढे यांनी केला. दरम्यान, या अपघातात मायबाप जनतेच्या Nana Patole Accident आशीर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत,अशी माहितीही अतुल लोंढे यांनी दिली आहे.

Nana Patole Accident या अपघातानंतर अतुल लोंढेंनी सोशल मिडीयावर पोस्ट टाकली आहे. त्यात काय म्हटले आहे वाचा

विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का ? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत.

भंडारा तालुक्यातील गणेशपूर येथील प्रचार सभा आटोल्यानंतर नाना पटोले हे आपल्या वाहनाने (एमएच ३१, एक्स झेड ७९७) खाजगी ताफ्यासह साकोली तालुक्यातील सुकळी या स्वगावी जाण्यास निघाले होते.Nana Patole Accident दरम्यान भंडारापासून ७ किलोमीटर अंतरावरील भीलेवाडा या गावाजवळ मागेहून येणाऱ्या ट्रकची (सीजी ०४, एन टी ८७३९) त्यांच्या कारला जोरदार धडक बसली. यात चालकाच्या मागच्या बाजुकडील भाग नुकसानग्रस्त झाला.

Pushpa 2 The Rule पायात घुंगरू, कानात डुल, गळ्यात पुष्माळ हातात त्रिशूल, अल्लू अर्जुन करणार तांडव, जबरदस्त ॲक्शन असलेला पुष्पा २ चा टिजर रिलीज

सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. अपघातानंतर तातडीने कारधा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक गणेश पिसाळ यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन ट्रक चालक गोवर्धन कुचराम (चितापूर, ता. भंडारा) याला अटक केली. या अपघातानंतर काही काळ मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांंनी ती पूर्ववत केली. या घटनेनंतर ताफ्यातील अन्य वाहनातून पटोले रात्रीच साकोलीकडे रवाना झाले.

Leave a Comment

error: Content is protected !!