अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक, २२ जून (चंचल पितांबरवाले प्रतीनिधी अकोट) : मोबाईल (Mobile) हा आपल्या जीवनातला अविभाज्य घटक झाला आहे. मोबाईलशिवाय आपले कुठलेच काम पूर्ण होत नाही. पण बऱ्याचदा हाच मोबाईल जीवघेणा ठरत असल्याच्या देखील घटना समोर आल्या आहेत. मोबाईलचा स्फोट Mobile Blast होऊन अनेकांचा मृत्यू तर काही जण जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात एका धक्कादायक घटनेत एका युवकाच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलला आग Mobile Blast लागली. शंकर बुंदेले नावाचा तरुण आपल्या दुचाकीवरुन नगर पालिकेत जात असताना त्याच्या खिशातून धूर निघताना त्याला लक्षात आले. बुंदेले यांनी ताबडतोब खिशातून मोबाईल काढून बाहेर फेकला. या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र या घटनेमुळे खिशात मोबाईल ठेवणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे..
बुंदेले यांच्या म्हणण्यानुसार: Mobile Blast
“मी नगरपालिकेत जात असताना मला माझ्या खिशातून धूर येताना दिसला. मी ताबडतोब खिशातून मोबाईल काढून टाकला. थोड्या वेळातच मोबाईल जळून खाक झाला. मला काय घडत आहे हेच समजले नाही.”
या घटनेची कारणे अद्याप स्पष्ट झाली नाहीत. काही लोकांचा असा अंदाज आहे की, चार्जिंग करताना मोबाईलमध्ये काहीतरी गडबड झाली असल्यास अशी घटना घडू शकते.
मोबाईलचा स्फोट होण्यामागची कारणं आणि अशी घ्या काळजी – Mobile Blast
ओरिजनल चार्जर –
मोबाईलचा वापर करताना तुम्ही ओरिजनल चार्जरचाच वापर करा. जर तुम्हाला मोबाईलसोबत मिळालेला चार्जर खराब झाला असेल तर तुम्ही कंपनीच्या अधिकृत स्टोअरमधून तो विकत घ्या. कोणताही कमी दर्जाच्या चार्जरचा वापर करु नका.
चार्जिंग जास्त करणं – Mobile Blast
मोबाईलला सूर्यप्रकाशात ठेवून कधीच चार्जिंग करु नका. यामुळे मोबाईल जास्त गरम होऊन त्याचा स्फोट होण्याची जास्त शक्यता असते. बऱ्याचदा चार्जिंग पूर्ण होऊन देखील मोबाईल चार्जिंग करत ठेवला तर तो गरम होतो. जर तुमचा मोबाईल वापरत असताना सतत गरम होत असेल तर त्याचा वापर करणं थांबवा. नंतर मोबाईल सामान्य तापमानात आल्यावर त्याचा वापर करा. महत्वाचे म्हणजे मोबाईल चार्जिंग करताना त्याला गरम वातावरणात ठेवू नका.
मोबाईल चार्जिंगला लावून बोलणे – Mobile Blast
बऱ्याचदा कामाच्या गडबडीत मोबाईलला चार्जिंग करणं आपण विसरतो. त्यामुळे अनेकदा आपण मोबाईल चार्जिंग करताना कॉलवर बोलतो. पण हे असं करणं खूपच चूकीचे आहे. चार्जिंग करताना मोबाईलचे तापमान हे जास्त असते. त्यामुळे मोबाईल गरम होऊ शकतो. अशामध्ये कॉलवर बोलल्यामुळे मोबाईलवर अधिक दबाव येऊन त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी म्हणून मोबाईल चार्जिंग करताना कॉलवर बोलू नका.
स्वस्त बॅटरी – Mobile Blast
बऱ्याचदा मोबाईलची बॅटरी खराब झाल्यावर अनेक जण पैसे वाचवण्यासाठी स्वस्तात किंवा लोकल बॅटरी मोबाईलमध्ये टाकतात. पण पैसे वाचवण्यासाठी असे करणं तुमच्या जीवावर बेतू शकते. स्वस्तातल्या बॅटरीमुळे मोबाईलचा स्फोट होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे ओरिजनल किंवा चांगल्या दर्जाची बॅटरीच खरेदी करण्याचा प्रयत्न करा.
गेम खेळताना – Mobile Blast
अनेकांना मोबाईलवर गेम खेळायला खूप आवडते. मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वजण मोबाईलवर गेम खेळतात. मोबाईलवर गेम खेळताना तो जास्त तापतो. मोबाईलचे तापमान जास्त वाढत गेले तर त्याच्या बॅटरीचा स्फोट होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे गेम खेळताना सावधान. लहान मुलांना गेम खेळायला देताना देखील विशेष काळजी घ्या.
मोबाईल खरेदी करताना हे लक्षात ठेवा – Mobile Blast
मोबाईल खरेदी करताना विशेष काळजी घेणं गरजेचे आहे. सरकारने मोबाईलसाठी बीआयएस मान्यता अनिर्वाय केली आहे. त्यामुळे मोबाईल खरेदी करताना तुम्ही बीआयएस सर्टिफाईड मोबाईलच खरेदी करा. बाजारात स्वस्त मिळाणारे चायनाचे मोबाईल तुम्ही अजिबात खरेदी करु नका. या फोनमधील बॅटरी हलक्या दर्जाच्या असतात. या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. खिशात मोबाईल ठेवणाऱ्यांनी आता खबरदारी घेणे आवश्यक आहे.